बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मासिक पाळीत स्वयंपाक करणारी स्त्री पुढच्या जन्मी कुत्री होणार अन् खाणारा पुरूष…”

मुंबई | मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला पुढचा जन्म कुत्रीचा येईल आणि ते अन्न जो पुरुष खातो त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल, असं वक्तव्य स्वामी कृष्णस्वरुप दास यांनी केलं आहे. भुज इथल्या स्वामी नारायण मंदिराचे ते स्वामी आहेत.

जे पुरूष अशा स्त्रियांच्या हाताचं जेेवण खात असतील तर ते या गोष्टीला जबाबदार आहेत. शास्त्रात याबाबत अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. लग्न होण्याच्या आधीपासून तुम्हाला या गोष्टी माहित असल्या पाहिजे असल्याचं स्वामी कृष्णस्वरुप दास यांनी म्हटलं आहे.

मी याआधी तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही सल्ला दिलेला नाही. आपल्या धर्मातल्या काही गोष्टींबाबत बोलू नका असे मला काही संत सांगत असतात. मात्र मी याबद्दलच बोललो नाही तर लोकांना समजणार कसं, असंही स्वामींनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराजांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. ‘अहमदाबाद मिरर’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

इंदोरीकरांच्या वादावर सिंधूताई सपकाळ यांची मोठी प्रतिक्रिया

“सरकारने इंदुरीकरांवर गुन्हा दाखल केला तर शिवप्रतिष्ठान ताकदीने रस्त्यावर उतरेल”

महत्वाच्या बातम्या-

तृप्ती देसाईंना धमकी देणाऱ्या स्मिता आष्टेकरांवर पोलिसांची कारवाई

…म्हणून मध्यावधी निवडणुका होणारच- नारायण राणे

माफी मागितली तरी इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल व्हायला हवा- तृप्ती देसाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More