मुंबई | मराठी मुलांची इंग्रजी भाषा पक्की नसल्याने त्यांच्या मनात नेहमी एक भीती राहते. त्यामुळे काही मुलं त्यांच्यामध्ये क्षमता असतानाही इंग्रजी भाषेच्या न्युनगंडामुळे मागे राहतात. अशाच मुलांसाठी मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने मोलाचा सल्ला दिला आहे.
आज एका चुणचुणीत मुलाला भेटलो!, मुंबईत नोकरी शोधतोय पण इंग्रजीचा न्यूनगंड आहे म्हणून त्याला ही सांगितलं आणि ट्विटही करतोय. इंग्रजी यायला पाहिजे पण इंग्रजी विक म्हणजे हुशारी, बुद्धिमत्ता नाही, अशा प्रेशर्सना बळी पडून स्वतःला कमी लेखू नका, असं स्वप्नील जोशीने म्हटलं आहे.
इंग्रजी म्हणजेच सर्वकाही असं नाही. इंग्रजी केवळ संवादाचं एक माध्यम आहे. आपल्या कल्पना, आपली हुशारी, कर्तृत्व आणि इच्छाशक्ती आपल्याला यशस्वी बनवते, असंच काहीसं स्वप्नीलने चाहत्यांना सूचवलं आहे.
दरम्यान, स्वप्नील जोशीने दिलेल्या या सल्ल्यामुळे चाहत्यांनी त्याच्या ट्विटवर अक्षरक्ष: लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
आज एका चुणचुणीत मुलाला भेटलो! मुंबईत नोकरी शोधतोय! पण Englishचा न्यूनगंड आहे! म्हणून त्याला ही सांगितलं/ट्वीतही करतोय!
English यायला पाहिजे ! पण English weak म्हणजे हुशारी, बुद्धिमत्ता नाही, अशा प्रेशर्सना बळी पडून स्वतःला कमी लेखू नका !— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) December 27, 2020
थोडक्यात बातम्या-
“कुणालाही ईडीची नोटीस मिळाली की भाजपला समोर केलं जातं
“मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली”
प्रसिद्ध सराफी व्यावसायिक मिलिंद मराठे यांचं निधन; आत्महत्येचा केला होता प्रयत्न
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली उतरणार राजकारणात?
पत्नीला मिळालेल्या ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…