बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून स्वप्निल जोशी म्हणतो; आम्हा कलाकारांना अकला नाहीत!

मुंबई | सिनेकलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर चर्चेत असतात. आता मराठी अभिनेता स्वप्निल जोशी देखील त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला आहे. त्याने या ट्विटमध्ये चक्क “आम्हा कलाकारांना अकला नाहीत”असं म्हटलंय. मात्र स्वप्निलने असं ट्विट का केलं? अशी चर्चा सध्या रंगली आहे. तर स्वप्निलने एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना असं ट्विट केलं आहे.

स्वप्निलला एका चाहत्याने ट्विटरवर “तु अजून शेतकरी आंदोलन, लखीमपूर घटना, महेश मांजरेकरांचा गोडसे चित्रपटाबद्दल काहीच का व्यक्त झाला नाहीस?”, असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना स्वप्निलने “कारण आम्हाला अकला नाहीत! आम्हाला नको तिथे नाक खुपसू नका; असा सल्ला इथेच मिळालाय!”, असं ट्विट केलं आहे. स्वप्निल केलेल्या या ट्विटमुळे आता स्वप्निल असं का म्हणाला?, असाच प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

मागील काही दिवस देशात शेतकरी आंदोलन, लखीमपूर हिंसाचार अशा अनेक घडामोडी सुरु आहेत. यावर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपली मत मांडली आहेत. मात्र सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारा अभिनेता स्वप्निल जोशी याने अजून काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. याशिवाय नुकतीच महेश मांजरेकरांनी आपल्या गोडसे या चित्रपटाची घोषणा केल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ माजली होती. मात्र तरीही स्वप्निलने यावर काहीच प्रतिक्रिया न दिल्याने एका चाहत्याने त्याला असा प्रश्न विचारला होता.

प्रकरणात आरोह वेलणकरची उडी 

सोशल मीडियावर अनेक वेळा वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आलेला अभिनेता आरोह वेलणकरनेही या प्रकरणात उडी घेतल्याचं पाहायला मिळालं. स्वप्निल जोशीने ट्विट केल्यानंतर आरोहने काही क्षणातचं “कडक स्वप्निल!!! मस्त झोडला. असं म्हणत स्वप्निलचं ट्विट रिट्विट केलं आहे. आरोहच्या या ट्विटनंतर  नेटकऱ्यांनी मात्र आरोहला चांगलंच धारेवर धरलं आहे. नेटकऱ्यांनी आरोहने केलेल्या ट्विटवर अनेक संतप्त प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More