बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला भाजपची लाख मोलाची मदत, तब्बल 20 लाखाचं फेडलं कर्ज

मुंबई |  एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या युवकाने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर राज्यातील वातवरण चांगलंच तापलं होतं. विधानसभेत देखील स्वप्नीलच्या आत्महत्येच्या मुद्यावरुन चर्चा पार पडली होती. कुटुंबावर लाखोंचं कर्ज असताना स्वप्नीलच्या कुटुंबाने हाताशी आलेला मुलगा गमावला आहे. यामुळे आता भाजपने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्वप्निलच्या कुटुंबाला मोठी मदत केली आहे.

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबावर तब्बल 19 लाख 96 हजार 965 रुपयांचं कर्ज आहे. या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भाजप नेत्यांनी स्वप्नीलचे वडिल सुनील लोणकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह इतर काही भाजप नेते उपस्थित होते.

स्वप्नीलच्या वडिलांना धनादेश सुपूर्त केल्यानंतर आपलं मत व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस  म्हणाले की, कुटुंबाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा असताना लोणकर यांचा मुलगा गेला. लोणकर कुटुंबाचं कर्ज फेडण्याचा निर्णय भाजपने घेतला आणि आज त्यांना हा धनादेश देण्यात आला.

तसेच खरं तर एवढ्या मोठ्या घटनेनंतर सरकारने तात्काळ मदत करणं अपेक्षित होतं. मात्र, सरकार संवेदनशील नाही, याचं वाईट वाटतं. थोडफार कर्ज माफ करता आलं असतं तर लोणकरांना जास्त मदत करता आली असती, असं देखील फडणवीसांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा झटका!

“मला आता फोन करा, मी तुमच्यासाठी कपडे काढेन”; पूनम पांडेचा धक्कादायक खुलासा!

पॉर्न प्रकरणात मोठी बातमी! राज कुंद्राने क्राईम ब्रांचला दिली इतक्या लाखांची लाच???

नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारा अपघात, चार मित्रांचा मृत्यू

‘भारतरत्न पुरस्कार माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्याबरोबरीचा’; प्रसिद्ध अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More