Loading...

‘आंटी’ म्हणणाऱ्या 4 वर्षीय मुलाला शिवीगाळ; स्वरा भास्करविरोधात तक्रार

नवी दिल्ली | अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. पुन्हा एकदा स्वरा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एका 4 वर्षीय मुलाला शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी स्वराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

स्वराने ‘सन ऑफ एबिश’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने गतकाळातील एक किस्सा सांगितला. एका जाहीरातीच्या शुटींच्या वेळी काम करत असताना लहान मुलाने मला आंटी म्हटलं होतं. त्यामुळे मला राग आला आणि मी त्याला मनात शिवी दिली, असं स्वराने सांगितलं.

Loading...

स्वराने लहान मुलाबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वराचा हा व्हीडिओ व्हायरल होत असून तिला ट्रोल केलं जात आहे.

दरम्यान, स्वरा भास्करला यापूर्वीही अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. तिच्या या नव्या व्हीडिओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

 

Loading...