बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पद्म पुरस्कार येत आहे’; विक्रम गोखलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून बॉलिवूड अभिनेत्रीने साधला निशाणा

मुंबई | भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं असल्याचं वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना रनौत हिने केलं आहे. कंगनाच्या या विधानानंतर अनेक वादांना तोंड फुटत असल्याचं दिसत आहे. जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या या वादग्रस्त विधानाची पाठराखण केली. त्यामुळे आता विक्रम गोखले अनेकांच्या निशाण्यावर आले आहेत.

कंगनाचं वादग्रस्त विधान आणि तिच्या या विधानाला विक्रम गोखलेंनी दर्शवलेला पाठिंबा यावरून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने विक्रम गोखलेंनी कंगनाच्या वक्तव्याला दर्शविलेल्या समर्थनावरून विक्रम गोखलेंवर जोरदार निशाणा साधला आहे. पद्म पुरस्कार लवकरच येत असल्याची खोचक टीका स्वरा भास्कर हीने केली आहे.

‘कंगना रनौत हीने केलेल्या वक्तव्याशी मी सहमत आहे. आपल्याला स्वातंत्र्य दिलं गेलं आहे. स्वातंत्र्यासाठी लढणारे योद्धे फासावर जात असताना मोठ्या लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी काहीच केलं नाही, ते फक्त शांतपणे बघत राहिले,’ असं विधान विक्रम गोखलेंनी कंगनाच्या समर्थनार्थ केलं होतं. गोखलेंच्या या वक्तव्याचा आधार घेत स्वरा भास्करने विक्रम गोखलेंवर टीका केली आहे.

1948 मध्ये देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून भीक आहे. देशाला खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं असल्याचं वादग्रस्त वक्तव्य कंगना रनौतने केलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टीकेची झोड उठली. तर विक्रम गोखलेंनी कंगनाच्या वक्तव्याला पाठींबा दिल्यानंतर अनेकांनी आता विक्रम गोखलेंवरही टीकास्त्र डागलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

इंधनाचे दर अमेरिकेत ठरतात, त्यासाठी केंद्र सरकारला दोषी ठरवणं चुकीचं – रावसाहेब दानवे

‘त्या’ चिमुरड्यांच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद पुन्हा बनला देवदूत

“वडील पट्टा लावून आडवे झालेत मुलगा परदेशात सेट झालाय”

आधार कार्ड व्हेरीफिकेशनसाठी नवा नियम! आता ‘ही’ असणार नवी प्रक्रिया

“निवडणुका जवळ आल्याने दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More