“संघींवर आता सिंहांच्या लव्ह जिहादचा धोका”, स्वरा भास्करची पोस्ट चर्चेत

Swara Bhaskar post on the dispute over the names of lions Akbar and Sita

Swara Bhaskar | भारतात सध्या एक मुद्दा चांगलाच गाजत आहे. सिलगुडीमधील ‘उत्तर बंगाल वन्यपशू उद्यान’ मध्ये अकबर व सीता नावाच्या सिंहांची जोडी आहे. सिंहाचे नाव अकबर आणि सिंहिणीचे नाव सीता असल्याने विश्व हिंदू परिषदेच्या बंगाल शाखेने त्यावर आक्षेप घेतला आहे. यावरूनच आता अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हीने थेट ‘लव्ह जिहाद’चा उल्लेख केला आहे.

अभिनेत्री स्वरा भास्करने एक पोस्ट करत या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर आक्षेप घेणाऱ्यांची तिने खिल्ली उडवली आहे. स्वराने एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) या संदर्भात पोस्ट केली आहे. यामुळे हे प्रकरण अजूनच चर्चेत आले आहे.

स्वरा भास्करची पोस्ट चर्चेत

“संघींवर आता सिंहांच्या लव्ह जिहादचा धोका आहे. आपण भारतात या अशा मूर्खपणाला मध्यवर्ती स्थान दिलं आहे!”,अशी पोस्ट स्वराने केली आहे. तिची ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे. लव्ह जिहादचा मुद्दा काढल्याने स्वराला (Swara Bhaskar) आता ट्रोलही केलं जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

सिलगुडीमधील ‘उत्तर बंगाल वन्यपशू उद्यान’ मध्ये ‘अकबर’ नावाच्या सिंहाबरोबर ‘सीता’ नावाच्या सिंहिणीला ठेवण्यात आल्याने नवीन वाद सुरू झाला आहे. यावर विश्व हिंदू परिषदेने कोलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणावर आता 20 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. “प्राण्यांची अदलाबदल केल्यानंतर सिलीगुडी ॲनिमल पार्कने सिंहिणीचे ‘सीता’ आणि सिंहाचे ‘अकबर’ असे नामकरण केले. असे करून त्यांनी सनातन धर्माशी संबंधित धार्मिक भावना दुखावल्या आहेत.”, असा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. या प्रकरणीच स्वरा भास्करने (Swara Bhaskar) केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

विश्व हिंदू परिषदेचे येथील प्रमुख दुलाल चंद्र राय म्हणाले की, “असे कसे होऊ शकते? यामुळे आमच्या धार्मिक भावनांना धक्का नाही का लागणार? आम्ही एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात गेलो पण आमचे काहीही ऐकून घेतले नाही. त्यामुळे आता आम्ही न्यायालयात गेलो आहोत.” या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेने सिंह आणि सिंहिणीचे नावे बदलण्याची विनंती केली असून, ज्यांनी ही नावे दिली आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे.

News Title- Swara Bhaskar post on the dispute over the names of lions Akbar and Sita

महत्त्वाच्या बातम्या –

टाटा समूहाला ‘देव’ पावणार? वैष्णोदेवी ते अयोध्येपर्यंत कमाईची ‘भारी’ योजना

OUT अन् 20 मिनिटांनी NOT OUT; रहाणेसोबत काय घडलं? प्रथमच झालं असं, कोचनं मागितली माफी

शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद; मोठा पोलीस बंदोबस्त, गावाचे छावणीत रूपांतर

…म्हणून शोएब सानियापासून वेगळा झाला; पतीला चीअर करताना सना, चाहत्यांनी घेतली फिरकी

सावधान! ‘या’ अशा महिलांपासून ‘दूरी है जरूरी’, कारण चाणक्य म्हणतात…

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .