Swargate Bus Stand Crime | विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे (Pune) शहरात स्वारगेट बस स्थानकावर एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे, महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. (Swargate Bus Stand Crime)
सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठी त्रुटी
स्वारगेट बस स्थानकावर (Swargate Bus Stand) अवघ्या १०० फुटांवर पोलीस चौकी, १८ सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षकांचा मोठा फौजफाटा असतानाही, दत्तात्रय रामदास गाडे (Dattatray Ramdas Gade) (वय ३६, राहणार शिक्रापूर) याने तरुणीवर अत्याचार केला. त्याने पीडितेच्या अज्ञानाचा फायदा घेत, तिच्यावर दोन वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आधीच जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. या घटनेनंतर त्याला पकडण्यासाठी आठ पथके तयार करण्यात आली आहेत, तसेच त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पीडित तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपीने असा रचला डाव
पुण्यात नोकरी करणारी पिडीत तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे स्वारगेट बस स्थानकात आली होती. बसची वाट पाहत असताना, आरोपी गाडेने तिला हेरले. त्याने तिला ‘फलटणची बस इथे लागत नाही, पलीकडे लागते’, असे सांगितले. परंतु, तरुणीने नेहमीप्रमाणे त्याच ठिकाणाहून बस पकडत असल्याचे सांगून नकार दिला.नंतर त्याने विश्वास संपादन करत तिला स्वारगेट-सोलापूर शिवशाही बसजवळ (Shivshahi Bus)नेले. बसमध्ये अंधार असल्याचे सांगितल्यावर, गाडेने प्रवासी लाईट बंद करून झोपल्याचे सांगितले. त्याने तिला मोबाईलची लाईट लावून बघायला सांगितले. तरुणी बसमध्ये चढताच त्याने तिचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर तिला मोठा धक्का बसला. तिने बसमधून खाली उतरल्यावर एका प्रवाशाला मदतीसाठी हाक मारली, पण त्याने दुर्लक्ष केले. यानंतर, ती फलटणच्या बसमध्ये बसून निघून गेली. (Swargate Bus Stand Crime)
प्रवासात अस्वस्थ वाटू लागल्यावर तिने मित्राला फोन करून तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. मित्राने धीर दिल्यावर ती परत स्वारगेटला आली आणि सकाळी पोलिसांत तक्रार दाखल केली.
Title : Swargate Bus Stand Crime update