पुढाऱ्यांसोबत फोटो, निवडणुकही लढवलेली; दत्तात्रय गाडेची कुंडली समोर

Swargate Bus Stand Rape

Swargate Case | पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) सध्या फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे. मात्र, या घटनेत एक नवा खुलासा झाला असून आरोपीचा राजकीय संबंध समोर आला आहे. गाडे हा आपल्या गावातील तंटामुक्ती निवडणुकीसाठी उभा राहिला होता. तसेच, निवडणुकीदरम्यान एका राजकीय नेत्याच्या प्रचारातही तो सक्रीय होता. (Swargate Case)

गुणाट गावच्या निवडणुकीत सहभाग

दत्तात्रय गाडे याने पुणे जिल्ह्यातील गुणाट (Gunat) गावात तंटामुक्ती समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, या निवडणुकीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर तो अधिक आक्रमक झाल्याचे गावातील लोक सांगतात. त्याच्या वर्तणुकीत अचानक बदल झाल्याचे लोकांच्या लक्षात आले होते.

निवडणुकीच्या काळात गाडे एका राजकीय पुढाऱ्याच्या प्रचारातही सहभागी झाला होता. त्या नेत्याच्या प्रचारसभांमध्ये तो सक्रीय होता आणि त्याने प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते. त्याच्या या राजकीय सहभागाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

राजकीय पुढाऱ्यासोबतचे फोटो व्हायरल

दत्तात्रय गाडेने ज्या राजकीय नेत्याच्या प्रचारात भाग घेतला, त्याच्या सोबतचे अनेक फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. स्थानिक पातळीवर हा आरोपी काही मोठ्या लोकांच्या संगतीत राहिला असल्याने पोलिस तपासात कोणते धक्कादायक धागेदोरे सापडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Swargate Case)

दरम्यान, पोलिसांनी गाडेचा शोध घेण्यासाठी १३ पथके तैनात केली असून तो अजूनही फरार आहे. आरोपीच्या माहितीबाबत पोलिसांनी एका लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याचा राजकीय संबंध तपासात महत्त्वाचा ठरणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Title : Swargate Case Accuseds Political Link Exposed

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .