दत्ता गाडेचा खोटारडेपणा उघड; तपासातून धक्कादायक माहिती समोर

Swargate Bus Case

Swargate Case | पुण्यातील स्वारगेट (Swargate Case) बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी दत्तात्रय गाडे या नराधमाला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेनंतरही आरोपीला त्याच्या कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळत आहे. पीडित महिलेने, आरोपीने तिचा गळा दाबला आणि जिवंत सोडण्यासाठी याचना केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. २५) घडली.

आरोपीने आवळला गळा

पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, आरोपीने तिला बसमध्ये कंडक्टर असल्याचे खोटे सांगितले आणि तिला घेऊन गेला. बसमध्ये जाताच त्याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला. त्यानंतर, बसमध्ये कोणीही नसल्याचे पाहून पीडितेने खाली जाण्याची विनंती केली. मात्र, आरोपीने तिला बसच्या सीटवर ढकलून दिले आणि तिच्यावर अत्याचार केला.

मदतीसाठी आवाज दिल्यानंतर आरोपीने तिचा गळा दाबला. आरोपीने आपल्याला जिवंत सोडावे यासाठी ती बचावाचा प्रयत्न करत होती आणि ‘काय करायचे ते कर, मला जिवंत ठेव’, अशी विनवणी करत होती.

पूर्वीही केला होता बलात्काराचा प्रयत्न

यापूर्वीही आरोपीने एकदा बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. मात्र, त्या प्रकरणातील पीडितेने घाबरून केवळ चोरीची तक्रार दिली होती. या घटनेनंतर आरोपीने पुन्हा एकदा दुसऱ्या एका तरुणीवर अत्याचार केला.

स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणात आरोपीचे वकील न्यायालयात संगनमताने हा प्रकार झाल्याचे सांगतात. त्यावेळी आरोपी दत्तात्रय याने काही पैसे दिल्याचेदेखील सांगितले गेले. तपासात मात्र आरोपीच्या बँक खात्यात घटनेपूर्वी महिनाभरापासून केवळ २४९ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, आरोपी अशा परिस्थितीत कुठून पैसे देईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Swargate Case)

पोलिसांनी तपासादरम्यान दोघांच्या मोबाइलचे २ वर्षांचे सीडीआर (CDR) तपासले. त्यात कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले नाही, अशी माहिती आहे. बसमधून उतरल्यानंतर पीडितेने आपल्या मित्राला आणि बहिणीला फोनद्वारे घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी तिला धीर देत स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले.

 Title : Swargate Case Woman Raped in Bus at Punes Swargate Bus Stand

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .