Swargate Crime | स्वारगेट ( Swargate Crime) बस डेपोतील गुन्ह्यातील मुख्य आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा प्राथमिक तपासानंतर संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर, त्याच्या गळ्यावर दोरीच्या वणांचे निशाण आढळले. तसेच, त्याच्या जवळ विषाची बाटलीही सापडल्याने त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी महत्त्वाचा खुलासा केला.
आरोपीच्या गळ्यावर दोरीचे वण, पोलिसांचा संशय वाढला
पत्रकार परिषदेत पोलिसांना आरोपी दत्ता गाडेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता का, याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी आयुक्त अमितेश कुमार यांनी सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासणीदरम्यान आरोपीच्या गळ्यावर दोरीच्या वणांचे निशाण दिसून आले.
त्यामुळे तो फाशी लावून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, दोरी तुटल्याने त्याचा प्रयत्न अपयशी ठरला आणि तो वाचला, असे त्यांनी स्पष्ट केले.
विषाची बाटली सापडल्याने आत्महत्येचा कट उघड
दत्ता गाडेच्या जवळ विषाची बाटली सापडल्याने त्याने आत्महत्या करण्याची योजना आखली होती, हे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर हा धक्कादायक खुलासा झाला. आरोपीला शोधण्यासाठी तब्बल 500 पोलीस तैनात होते. त्याचवेळी काही ग्रामस्थांनी त्याला संभाषणात गुंतवून ठेवल्याने पोलिसांना त्याला पकडणे शक्य झाले.
आता पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न सत्य होता का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक तपशीलवार चौकशी करत आहेत.
Title : Swargate crime Accused Tried Suicide Failed