Swargate Crime | स्वारगेट (Swargate Crime) बसस्थानकात एका महिलेसोबत झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. फलटण येथे जाण्यासाठी आलेल्या महिलेची दिशाभूल करून तिला शिवशाही बसमध्ये नेण्यात आले आणि तेथे तिच्यावर बलात्कार (Rape In Shivshahi Bus) करण्यात आला.
शिवशाही बसमध्ये घडला अमानुष प्रकार
बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट (Swargate) बसस्थानकात ही धक्कादायक घटना घडली. एका २६ वर्षीय महिला फलटणला जाण्यासाठी बसस्थानकावर आली होती. यावेळी एका व्यक्तीने तिला चुकीची माहिती देत गोंधळात टाकले. त्याने सांगितले की, फलटणकडे जाणारी बस येथे लागत नाही, तर दुसऱ्या ठिकाणी उभी असते. महिलेला अधिक विश्वास मिळावा यासाठी त्याने आपली १० वर्षांची ओळख असल्याचे भासवले.
गोंधळलेल्या महिलेला त्या व्यक्तीने एका आडबाजूला असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये अंधार असल्याने त्याने तिला दरवाजा उघडून आत जाण्यास सांगितले. ती आत गेल्यावर तो देखील तिच्या मागोमाग गेला आणि दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला. या धक्कादायक घटनेनंतर ही महिला फलटणला जाण्यास निघाली होती, मात्र नंतर मन बदलून तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीची ओळख पटली. दत्तात्रय रामदास गाडे (Dattatraya Ramdas Gade) (वय ३५, रा. शिक्रापूर) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर जबरी चोरीचे दोन गुन्हे आधीच दाखल आहेत. (Swargate Crime)
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil) यांनी सांगितले की, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची ८ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांमध्येही त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Title : Swargate Crime Woman Raped in ST Bus Accused on the Run