Swargate Rape Case | पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय रामदास गाडे याला पोलिसांनी अटक केली. मात्र, अटकेपूर्वी पोलिसांचा मोठा गोंधळ उडाला. आरोपी समजून पोलिसांनी चक्क त्याच्या भावालाच ताब्यात घेतले. (Swargate Rape Case)
दत्ता समजून दुसऱ्याला पकडले
गुणाट या गावी शोधमोहीम सुरू असताना, पोलिसांना आरोपी दत्तात्रय गाडेसारखा दिसणारा एक तरुण दिसला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला ताब्यात घेतले. दत्ता सापडला, असे समजून पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
‘तुम्ही दत्ताला शोधताय ना?’
जवळपास १५ ते २० मिनिटांनंतर सत्य समोर आले. ताब्यात घेतलेला तरुण दत्ता नसून, त्याचा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घरावर धाड टाकली तेव्हा, आरोपीचा भाऊ घरात होता. तो हुबेहूब दत्तासारखा दिसत असल्याने पोलिसांचा गोंधळ उडाला. “तो मी नव्हेच. माझा भाऊ माझ्यासारखा दिसतो, तुम्ही दत्ता गाडेला शोधताय ना?” असा प्रश्न त्याने पोलिसांना केला. पोलिसांनी त्याची चौकशी करून सोडून दिले.
अखेर दत्ता सापडला
नातेवाईकांच्या घरी जाऊन आलेल्या दत्ताला शोधण्यात पोलिसांना यश आले. तो एका कॅनॉलमध्ये झोपलेला असताना सापडला.
आरोपी दत्तात्रय गाडे याची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. रात्री २ वाजता त्याला पुण्यात आणण्यात आले आणि ३ वाजता त्याची वैद्यकीय तपासणी झाली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Title : Swargate Rape Case Police Confuse Accused with Look-alike