Dattatray Gade l पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना यश आले, पण या अटकेमागे नातेवाईकांनी दिलेल्या माहितीची महत्त्वाची भूमिका होती. आरोपी दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी पोलिस शर्थीचे प्रयत्न करत होते, मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता.
भुकेने व्याकूळ आरोपीची नातेवाईकांकडे धाव :
पोलिसांनी (Police) उसाच्या शेतात शोधमोहीम राबवली, पण दत्तात्रय तिथे सापडला नाही. दोन दिवस लपून बसल्याने आणि भूकेने व्याकूळ झाल्याने, तो रात्री १० ते १०:३० च्या सुमारास आपला नातेवाईक महेश बहीरट याच्या घरी आला. त्याने पाण्याची बाटली घेतली आणि “माझी मोठी चूक झालीय, मला सरेंडर (Surrender) करायचं आहे”, असं सांगून तो तिथून निघून गेला.
Dattatray Gade l नातेवाईकाची माहिती पोलिसांसाठी मोलाची :
दत्तात्रय गाडे गावात असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनीच पोलिसांना दिली. पोलिसांचा शोध सुरू असल्याची चाहूल लागल्याने दत्तात्रय तिथून निघून गेला असला, तरी नातेवाईकांनी दिलेल्या या माहितीमुळे पोलिसांना तपासाची योग्य दिशा मिळाली.
या घटनेतून, आरोपी कितीही हुशार असला, तरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि योग्य माहिती मिळाल्यास तो कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हेच दिसून येते.
News title :Swargate Rape Case: Relative’s Tip-off Leads to Accused’s Arrest