“चार शिवशाही बस उभ्या असून, त्या लॉजिंगसारख्या…”, वसंत मोरेंच्या खुलाशाने खळबळ

Swargate Rape Case Shiv Sena Protests Security Lapses Exposed

Swargate Rape Case | स्वारगेट (Swargate Rape Case) बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी पहाटे घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेनंतर शिवसेना (Shiv Sena – Uddhav Balasaheb Thackeray) ठाकरे गट आक्रमक झाला असून, त्यांनी बसस्थानकात धडक देत सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

शिवसेनेचे आंदोलन आणि तोडफोड

शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी स्वारगेट बस स्थानकावर जोरदार आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी बस आगारातील सुरक्षा रक्षकांच्या केबिनवर हल्ला चढवत तोडफोड केली. वसंत मोरे यांनी आरोप केला की, स्वारगेट बसस्थानकातील बंद शिवशाही बसमधील परिस्थिती पाहता येथे रोज अशा घटना घडत असल्याचे स्पष्ट होते.

त्यांनी सांगितले की, बसस्थानकाच्या मागच्या भागात चार शिवशाही बस उभ्या असून, त्या लॉजिंगसारख्या वापरल्या जात आहेत. या बसमध्ये मोठ्या प्रमाणावर कंडोम, महिलांचे कपडे, बेडशीट आणि मद्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. यावरूनच हे प्रकार सुरक्षारक्षकांच्या संमतीने घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर आरोप

वसंत मोरे यांनी थेट सुरक्षा रक्षकांवर निशाणा साधत म्हटले की, स्वारगेट एसटी बस स्थानकात २४ तास सुरक्षा रक्षक असतात, तरीही अशा घटना घडतात. बलात्कार झालेली गाडी ही सुरक्षा रक्षकांच्या केबिनसमोर उभी होती, तरीही ही घटना घडली. यावरून स्पष्ट होते की, या सुरक्षारक्षकांना येथे बसण्याचा काहीही अधिकार नाही. (Swargate Rape Case)

त्यांनी आव्हान दिले की, कोणीही बसस्थानकात जाऊन पाहिले तर बंद असलेल्या बसमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह वस्तू आढळतील. त्यामुळे हे प्रकार नियमित सुरू असून, यात सुरक्षा कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. याप्रकरणी योग्य ती कारवाई झाली नाही, तर शिवसेना अधिक तीव्र आंदोलन करेल, असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.

Title : Swargate Rape Case Shiv Sena Protests Security Lapses Exposed

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .