स्वारगेट प्रकरणातील पीडितेच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची आपडेट!

pune swargate news

Pune Swargate Crime | स्वारगेट (Swargate Rape Case) बसस्थानकात बुधवारी पहाटे घडलेल्या धक्कादायक बलात्कार प्रकरणानंतर पीडित तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणारी ठरली असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पीडितेवर उपचार सुरू-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर वैद्यकीय आणि मानसिक उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असली तरी ती मानसिकदृष्ट्या (Swargate Rape Case) मोठ्या धक्क्यात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत नवे निर्णय घेण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.

फरार आरोपीसाठी 1 लाखांचे बक्षीस जाहीर-

या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) हा अद्याप फरार असून, त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून, याआधीही त्याच्यावर जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी आठ विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून, त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

बसस्थानकातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह-

स्वारगेट बसस्थानकात महिलांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक एसटी बसगाड्या धूळखात पडलेल्या आहेत, आणि या बसमध्ये मद्याच्या बाटल्या, कंडोमच्या पाकिटांचा खच पडल्याचे समोर आले आहे. यामुळे बसस्थानक सुरक्षित आहे की गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

बसचा दरवाजा का उघडला? तांत्रिक तपासणी सुरू

या घटनेनंतर बसच्या दरवाज्याबाबतही तांत्रिक चौकशी सुरू झाली आहे. चालकाने बस लॉक केली होती, मात्र गाडी बंद असताना एअर प्रेशर कमी झाल्याने दरवाजा उघडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस निर्णय होईपर्यंत हा विषय ऐरणीवर राहणार आहे.

News Title : Swargate Rape Case Victim’s Condition Stable

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .