दत्तात्रय गाडेच्या अटकेनंतर DCP पिंगळेंकडून गावकऱ्यांना सॅल्यूट, म्हणाले…

Swargate Rape Case Villagers' Help Crucial in Accused's Arrest

Swargate Rape Case | पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. तब्बल ४५ तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. या संपूर्ण शोधमोहिमेत गुणाट ग्रामस्थांनी पोलिसांना मोलाची मदत केली, त्याबद्दल पोलिसांनी गावकऱ्यांचे आभार मानले आहेत. (Swargate Rape Case)

गावकऱ्यांचे पोलिसांना सहकार्य

गुणाट गावात १०० पोलिसांचे पथक दाखल झाले आणि त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला. गुरुवारी दिवसभर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला, पण दत्तात्रय गाडेने पोलिसांना चकवा दिला. गावकऱ्यांनी मात्र पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य केले.

दोन दिवस उसात लपून बसलेला आरोपी जेवायला मिळत नसल्याने पाणी पिण्यासाठी आपल्या नातेवाईकांकडे गेला. याच नातेवाईकांनी त्याची माहिती गावातील काही जणांना दिली. पोलिसांनी आरोपीच्या मित्राला चौकशीसाठी बोलावले. आपल्या घरातील सदस्याची चौकशी होत असल्याचे पाहून, गणेश गव्हाणे याने आरोपीला पकडून देण्याचा निर्धार केला.

डीसीपी निखिल पिंगळे (DCP Nikhil Pingale) यांनी स्वतः या शोधमोहिमेचे नेतृत्व केले. “गुणाट गावकऱ्यांनी पोलिसांना केलेले सहकार्य मोलाचे ठरले. त्यांच्या मदतीमुळेच आरोपीला अटक करणे शक्य झाले. मागचे 24 तास आम्ही आरोपीला शोधत होतो,” असे त्यांनी सांगितले.

असा घडला अटकेचा थरार

आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांना चकमा देत होता. तो रात्री नातेवाईक महेश बहीरट यांच्या घरी गेला. नातेवाईकांनी गावकऱ्यांना आणि  पोलिसांना माहिती दिली. दत्तात्रयने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली आणि “माझी मोठी चूक झाली, मला शरण यायचे आहे,” असे सांगून निघून गेला. (Swargate Rape Case)

पोलिसांनी डॉग स्कॉडच्या मदतीने शोध घेतला, पण आरोपी सापडला नाही. तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॉलमध्ये झोपला होता. ग्रामस्थांनी त्याला ओळखले आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले आणि पुण्याला रवाना झाले.

Title : Swargate Rape Case Villagers’ Help Crucial in Accused’s Arrest

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .