पुणे | ‘स्व’-रुपवर्धिनी संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 50 गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केलं जाणार आहे.
ज्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करुन अधिकारी व्हायचे आहे, मात्र बिकट परिस्थितीमुळे क्लास, अभ्यासिका, ग्रंथालय लावणे परवडत नाही, अशा विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांमधून 50 जणांची लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
संस्थेच्या वेबसाईटवर यासंदर्भातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याशिवाय संस्थेच्या कार्यालयात जाऊनही गरजू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीविषयी अधिक माहिती मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
-आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राखी सावंतचा बोल्ड योगा, पाहा फोटो
-भाजप दहशतवादी संघटना आहे- ममता बॅनर्जी
-पंतप्रधानांच्या घरी हलला पाळणा!
-भय्यू महाराजांना जवळच्या व्यक्तीनेच दिला धोका?
-भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा शरद पवारांना टोला
Comments are closed.