बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मल्लखांबच्या माध्यमातून शिवरायांना अनोखी मानवंदना, हा व्हिडीओ पाहाच…

पुणे | शिवजयंती निमित्त राज्यभरात मोठा उत्साह पहायला मिळाला. महाराष्ट्रासह देश-विदेशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करुन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. पुण्यातील ‘स्व’रुपवर्धिनी संस्थेच्या मुलांचा असाच एक शिवरायांना मानवंदना देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

‘स्व’रुपवर्धिनी ही पुण्याच्या मंगळवार पेठेत गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी प्रयत्न करणारी संस्था आहे. त्यांच्याकडून मुलांच्या शारीरिक कसरतीसाठी मल्लखांब शिकवण्याचं देखील काम केलं जातं.

‘स्व’रुपवर्धिनी संस्थेत शिकणाऱ्या मुलांनी आपल्या मल्लखांबचं प्रात्यक्षिक दाखवून आतापर्यंत अनेकांची मनं जिंकली आहेत, तसेच राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारही मिळवले आहेत.

दरम्यान, आता याच मुलांनी शिवजयंतीच्या निमित्ताने मल्लखांबचं प्रात्यक्षिक दाखवून शिवरायांना अनोखी मानवंदना दिली आहे. त्यांच्या हाच व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला असून या मुलांच्या कौशल्याची प्रशंसा केली जातेय.

पाहा व्हिडीओ-

ट्रेंडिंग बातम्या-

-“पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना… मला काही सांगायचं आहे”

-इंदोरीकरांच्या वादावर सिंधूताई सपकाळ यांची मोठी प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या-

इंदोरीकर महाराजांनी थोडा संयम ठेवावा- राधाकृष्ण विखे पाटील

स्वगृही परतण्याच्या चर्चांवर राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं वक्तव्य

शेतकऱ्यासांठी 15 हजार कोटींचा आकस्मिक निधी, तर साडेनऊ लाख विद्यार्थ्यांना चष्मा वाटप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More