मुंबई | दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावर माजी क्रिकेटर भारतरत्न सचिन तेंडुलकरने ट्विट केल्याने तो अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचा प्रवक्ता रणजीत बागलने सचिनच्या घराबाहेर पोस्टरबाजी करत एक मागणी केली आहे.
सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील, अशा प्रश्नाचं फलक दाखवत रणजित बागलने सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील घराबाहेर निदर्शन केलं आहे.
सचिनने केलेल्या ट्विटमुळे त्यावर चाहतेही नाराज झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सचिन तेंडुलकरला वेगळ्या क्षेत्राबद्दल बोलताना काळजी घ्यायला पाहिजे, असा सल्ला दिला होता.
दरम्यान, रणजीत बागलच्य या प्रश्वावर सचिन तेंडुलकर काय उत्तर हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सचिनच्या घराबाहेर स्वाभिमानीची बॅनरबाजी #म pic.twitter.com/WmheswmAGk
— थोडक्यात (@thodkyaat) February 8, 2021
थोडक्यात बातम्या-
“राज्यात ऑपरेशन लोट्स झाल्यास भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही”
…तर यापुढे 30 टक्के पगार आई-वडिलांच्या खात्यावर जमा होणार!
अबब!!! एका चुकीमुळं 50 लाख फॉलोवर्स असलेल्या ‘या’ अभिनेत्रीचं नाक झालं विद्रुप!
‘शरद पवार सुधारणांच्या बाजूने, मात्र…’; संसदेत नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य
…म्हणून पोलिसांनी चक्क कोंबड्यांनाच पोलीस कोठडीत डांबलं!