बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सावरकर देशातील स्वातंत्र्य वीरांचे मुकूटमणी, पण भाजप नेत्यांनी…”

मुंबई | शिवसेनेची भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत भाजपवर टीका करण्याची आलेली एकही संधी सोडताना दिसत नाहीत. संजय राऊत आपल्या मिश्किल शैलीत भाजपच्या नेत्यांना फटकारत असतात. त्यातच आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलेल्या वक्तव्यावरून देशभरात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यावरून संजय राऊत यांनी राजनाथ सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील स्वातंत्र्य वीरांचे मुकुटमणी आहेत, पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केली, असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. जर राजनाथ सिंह यांनी अभ्यास केला असता तर त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला आहे.

स्वातंत्र्यावीर सावरकरांनी हिंदूत्वाची मांडणी केली. सावरकर ज्यावेळी अंदमान निकोबारमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. त्यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून ब्रिटिशांकडे दया याचिका केली होती, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं होतं. त्यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत राजनाथ सिंग यांना निशाण्यावर घेतलं आहे.

दरम्यान, आम्ही खरे फकीर आहोत. आम्ही कधी रेल्वे स्टेशनवर चहा विकला नाही. पण बाळासाहेबांनी आम्हाला फकिरी शिकवली आहे. देशासाठी प्राणार्पण करण्याची, त्यागाची वृत्ती आम्हाला शिवसेनाप्रमुखांना शिकवली आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

पुढील 4 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ 14 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला उच्च न्यायालयाचा दणका

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

“भारतीय नागरिक आरएसएसमुळेच सुरक्षित, त्यांच्यामुळे देशाला शांती लाभली”

मोठी बातमी! अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या सुरक्षेत मोठी वाढ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More