मुंबई | स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ प्रदान करुन यथोचित गौरव करण्याची मागणी भाजपकडून होत आहे. मात्र भाजप सत्तेवर असताना त्यांना विसर पडला होता का?, असा प्रश्न इतर पक्षांकडून विचारला जात आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे.
राष्ट्रपुरुषांच्या यादीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव असायलाच पाहिजे. ते चुकून राहिलं असेल. तर या सरकारने ताबडतोब ही चूक दुरुस्त करावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी भाजपने किंती पत्र पाठवली, असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला होता.
मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या सामान्य प्रशासन विभागाकडून राष्ट्रपुरुष, थोर पुरुष यांची यादी जाहीर होते. त्यांची छायाचित्रं मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री आणि सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये लावणं बंधनकारक आहे.
एकीकडे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनीही सावरकरांचं योगदान नाकारता येणार नसल्याचं कबूल केलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोणतीही भाषा हे संवादाचं माध्यम आहे आशय नाही- नागराज मंजुळे
देशभरातून होत असलेल्या राजीनाम्याच्या मागणीनंतर शहांनी दिल्लीकरांना केलं हे आवाहन
महत्वाच्या बातम्या-
फडणवीसांच्या काळातील बळीराजा चेतना अभियानात 6 कोटी 25 लाखांचा घोटाळा; भाजप आमदाराचा आरोप
भास्कर जाधवांची नाराजी कायम; सभागृहात शिवसेनाविरोधात आवाज
“मला वाटलं होतं पोरगा नाव काढेल पण कारट्यानं नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली”
Comments are closed.