‘या’ तारखेला होणार 33 मंत्र्याचा शपथविधी, कोणाला किती मंत्रिपदं मिळणार?

Maharashtra l आज राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण आजपासून महाराष्ट्रात देवेंद्र पर्वाला सुरुवात होणार आहे. आज भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. मात्र ते यावेळी महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री असणार आहेत. तसेच फडणवीसांसोबतच अजित पवार, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र अशातच आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यासंदर्भात देखील महत्वाची माहिती समोर आली आहे.

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? :

मिळालेल्या माहितीनुसार, आज मुंबईतील आझाद मैदानावर फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यानंतर नव्या फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या 11 डिसेंबर 2024 रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारावेळी तब्बल 33 जणांचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Maharashtra l कोणत्या पक्षाला किती खाती मिळणार? :

दरम्यान, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 नेते, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 10 नेते आणि भाजपचे 15 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं समजत आहे. त्यामुळे आता या आकडेवारीनुसार फडणवीसांच्या नवीन मंत्रीमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह 33 जणांचा समावेश असणार असल्याचं म्हंटल जात आहे.

याशिवाय मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेनेचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी देखील भाष्य केले आहे. आज एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वेळ कमी मिळाल्याने आज फक्त तिघांचा शपथविधी होणार आहे. तसेच आज कोणत्या पक्षाला किती खाती मिळतील, याबाबत देखील चर्चा होणार आहे.

तसेच शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे योग्य खाती पक्षाकडे घेतील. तसेच प्रत्येक पक्ष आपपल्या पद्धतीने मंत्रिपदाची मागणी करतील असं देखील भरत गोगावले म्हणाले आहेत.

News Title : swearing in ceremony of 33 ministers on December 11 in the maharashtra

महत्त्वाच्या बातम्या-

एकनाथ शिंदेंचं ठरलं! मोठा निर्णय घेतला

“शिंदेंमध्ये दिल्लीसोबत पंगा घ्यायची हिंमत नाही, त्यामुळे…”; संजय राऊतांनी डिवचलं

अखेर फडणविसांच्या मनधरणीला यश, एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ!

शपथविधीपूर्वीच सोनं झालं स्वस्त, ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा कुठे व किती वाजता? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर