नागपूर | सॅनिटायझर प्यायल्याने नागपूरात एका पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दररोज दारू पिण्याची सवय असलेल्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने दारू न मिळाल्याने घरातील सॅनिटायझर प्राशन केले. यामुळे प्रकृती खराब होऊन त्याचा मृत्यू झाला.
गौतम गोस्वामी नागपूर महानगरपालिकेत सफाई कर्मचारी होते. त्यांना दारूचे प्रचंड व्यसन होतं. 21 जून रोजी घरी असताना पुरेशी दारू न मिळाल्यामुळे आणि दारू खरेदी करण्यासाठी आणखी पैसे नसल्यामुळे गौतम यांनी कुटुंबीयांचे लक्ष नसताना घरातील सॅनिटायझरच्या बॉटल मधून सॅनिटायझर प्राशन केलं.
त्यानंतर संध्याकाळी त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. आठ त्यांच्यावर उपचार झाले. पण, रविवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.
गौतम हे महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. नागपूरात ते पत्नी आणि मुलासह राहात होते. त्यांना दारूचं व्यसन होतं. पण, टाळेबंदीमध्ये त्यांना दारू मिळत नव्हती.
ट्रेंडिंग बातम्या-
अॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”
महत्वाच्या बातम्या-
या कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी राज्य शासनाची रेल्वे मंत्रालयाला विनंती
या विभागातील कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा लागू, मंत्री गुलाबराव पाटलांची घोषणा
नाशिकमध्ये कडक लॉकडाउन, पालकमंत्री छगन भुजबळ यांचा निर्णय