आई-वडिलांच्या लग्नात चिमुकलीचा हायव्होल्टेज ड्रामा ; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
नवी दिल्ली | सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा व्हिडीओंना प्रचंड लाईक्स, कमेंट्स करुन त्यांना मोठ्या प्रमाणात शेअर देखील केलं जातं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. विदेशात लग्नाआधी मुल होणं ही साधारण गोष्ट असून अनेक लोक मुलं झाल्यानंतर लग्न करतात. असंच एक लग्न या जोडप्याच्या मुलीमुळे सध्या चर्चेत आलं आहे. या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ एका जोडप्याच्या लग्नातला आहे. या लग्नात त्यांच्या मुलीने जोरदार गोंधळ घातल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये लग्न होत असलेल्या जोडप्याच्या मुलीने कार्पेटवर झोपून रडत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. आपल्या आईने आपल्याला उचलून घ्यावं यासाठी ही चिमुकली रडताना दिसत आहे.
या चिमुकलीचे नखरे पाहून लग्नाला आलेल्या पाहुण्यांमध्येही एकच हशा पिकला. या व्हिडीओच्या अखेरमध्ये या चिमुकलीच्या आईने तिला उचलून घेतलं आहे. हा व्हिडीओ वधूने ही आमची मुलगी आणि हीने आमच्या लग्नामध्ये खुप ड्रामा केला, असं कॅपशन देत तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता.
दरम्यान, हा संपुर्ण व्हिडीओ लोकांच्या प्रचंड पसंतीला आला असून या व्हिडीओला 15 मिलीयन्स पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
अब्रू वाचवण्यासाठी माजी मंत्र्यांनी पळपुटेपणा केला- धनंजय मुंडे
मलायका अरोराचा हॉट अंदाज; शेअर केला जीममध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ, पाहा व्हिडीओ
“नागपुरात जन्म घेतलेली संघटना…”; राहुल गांधींची संघावर बोचरी टीका
“इतरांना तुच्छ लेखण्याचा महाजनांचा स्वभावच जळगावात भाजपला घेऊन बुडाला”
‘मेधा कुलकर्णी आपण एका जीवाचा बळी घेतलाय’; रूपाली चाकणकरांचा मेधा कुलकर्णींवर गंभीर आरोप
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.