Top News

45 मिनिटांत घरात पोहोचणार रेशनिंगचं सामान, Swiggyकडून या नव्या सुविधेला सुरुवात

मुंबई | भारतात कोरोनानं थैमान घातलेलं असून, लोकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, असंही सरकारकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत लोकांना ऑनलाइन डिलीव्हरी अ‌ॅपचा चांगला उपयोग होतोय.

लोक घरी बसून ऑर्डर करू शकतात आणि अन्नधान्य, भाजीपाला ते आपल्या घराच्या दारापर्यंत पोहोचतात. आज यात आणखी एका कंपनीचे नाव जोडले गेले आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी ऍप स्विगीने आता अवघ्या 45 मिनिटांत रेशनची होम डिलिव्हरी सुरू केली आहे.

कंपनीने आपल्या किराणा होम डिलीव्हरी सेवेचे नाव स्विगी इन्स्टामार्ट असं ठेवलं आहे. सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत रेशन मागवू शकतो. ऑनलाइन शॉपिंग आणि होम डिलिव्हरी पाहता स्विगीनेही या विभागात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

ऑनलाइन शॉपिंग आणि होम डिलिव्हरी पाहता स्विगीनेही या विभागात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या सेगमेंटमध्ये स्विगी फ्लिपकार्ट क्विक, बिग बास्केट, डुन्झो, ग्रोफर्सशी स्पर्धा करणार आहे. स्विगीच्या म्हणण्यानुसार ऑर्डर मिळाल्यानंतर 30-45 मिनिटांत वस्तूंची होम डिलिव्हरी केली जाईल. ही सुविधा सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत उपलब्ध असेल. स्नॅक्स, आइस्क्रीम, इन्स्टंट जेवण, फळ-भाज्या, किराणा वस्तू ऑर्डर स्विगी इन्स्टामार्ट सेवेद्वारे देता येतात.

डार्क स्टोअर्सद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची कंपनीची योजना आहे. त्यात 2,500 हून अधिक वस्तू उपलब्ध असतील. स्विगी आक्रमकपणे या विभागात जाण्याची तयारी करत आहे. व्हर्च्युअल स्टोअरच्या भागीदारीत स्विगीने ही सेवा सुरू केली आहे. सध्या गुरुग्राममध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अखेर सचिन पायलट यांचं विमान काँग्रेसच्या धावपट्टीवर लँड

नागपुरात नदी नाल्यांवरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरूवा

विद्यार्थ्यांना फी साठी सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे- बच्चू कडू

भाजपच्या किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण

चहा पिताना एकमेकांकडे पाहणं पडलं महागात, तिघांनी तरूणावर कोयत्याने केले वार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या