देवेंद्र फडणवीस यांच्यावर टांगती तलवार; फोन टॅपिंग प्रकरणात चौकशीची शक्यता
मुंबई | मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक प्रकरणे बाहेर येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर ‘डेटा बाॅम्ब’ फोडला होता. आता हेच प्रकरण फडणवीस यांच्या अंगलोटी येताना दिसत आहे. पुण्याच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी अनिधीकृत पद्धतीने 100 हून अधिक मंत्र्यांचे तसेच अधिकाऱ्यांचे फोन टॅप केले होते. या प्रकरणात सरकारने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून आता सायबर सेलने अज्ञात व्यक्तीच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राज्य गुप्तचर आधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून, फोन टॅपिंग प्रकरणात सायबर सेलने अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुप्तचर विभागाचे गोपनीय पत्रे बेकादेशीर रित्या मिळवण्यात आली होती, असं या तक्रारीत म्हटलं आहे. ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट 1930च्या अंतर्गत असणाऱ्या भारतीय टेलिग्राम अधिनियम 1885 च्या कलम 30 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत असताना कागद आणि पेन ड्राईव दाखवत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हे पुरावे फडणवीस यांच्याकडे कसे आले? असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यानंतर फडणवीस यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांची चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रश्मी शुक्ला यांची सध्या केंद्रात सेवाबदली झाली आहे. त्यामुळे त्यांना आधी महाराष्ट्रात बदली करून घेण्याची तयारी राज्य सरकारची असेल. तर फडणवीस यांच्याकडे हे गोपनीय आणि महत्वाचे कागदपत्रे कुठून आले हे देखील फडणवीस यांना स्पष्ट करावे लागेल.
थोडक्यात बातम्या-
‘नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का?’; मनसे आमदार राजू पाटील यांचा संतप्त सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आले, तरी…- चंद्रकांत पाटील
महावितरणाच्या अधिकाऱ्याला चप्पलीचा हार घालून खुर्चीला बांधलं; भाजप आमदाराचा कारनामा
“लोक सांगूनही ऐकत नाहीत, मग लॉकडाऊन हाच पर्याय”
पुण्यातील फॅशन स्ट्रीटला लागलेल्या भीषण आगीत 800 दुकानं जळून खाक!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.