शिक्रापूर | शिरूर शहरात लॉकडाऊन सुरु असल्याने विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरूद्ध पोलिस कारवाई करतायत. यासाठी रात्रगस्त जोरदार सुरु आहे. असंच रात्रीगस्तीच्या वेळी पोलिसांनी शिरूर बसस्थानकावर रिक्षा लावून आत बसलेल्या रिक्षाचालकास नाव विचारण्यासाठी हटकलं. त्यावेळी पोलिसांनी रिक्षाची झडती घेतली असता चालकाच्या सीटखाली धारदार तलवार आढळून आली.
याप्रकरणी शिरुर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केलीये. करीम इमाम शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस शिपाई उमेश जायपत्रे आणि होमगार्ड प्रदीप रोकडे हे रात्रगस्त घालत असताना शिरूर बसस्थानक शेख हा त्याच्या जवळील रिक्षामध्ये बसलेला दिसला. त्याच्या वर सशंय आल्याने त्याला नाव, पत्ता विचारले असता त्याने उडवाउडावीची उत्तरं दिली.
पोलिसांचा त्याच्यावर अधिकच संशय बळावल्याने त्यांची आणि रिक्षाची झडती घेतली. रिक्षाच्या चालकाच्या सीटखाली एका सापटीत तलवार सापडली. ही तलवार कशासाठी ठेवली, कुठून आणली असं विचारलं असता करीम शेख याने उडवाउडवीची उत्तरं दिली.
करीम शेखला रिक्षासह ताब्यात घेउन त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला शिरूर न्यायालयासमोर उभे केलं असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. पुढील तपास शिरुरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे करत आहेत. करीम शेखने रिक्षात तलवार कोणत्या उद्देशाने ठेवली होती, रात्रीच्या वेळी त्याला तलवारीच्या धाक धाकवून कुठले गैरकृत्य करायचं होतं का? याचा शोध आता शिरूर पोलिसांकडून घेण्यात येतोय.
महत्वाच्या बातम्या-
राहुल बजाज यांचा बजाज फायनान्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
आमचा मान राखला जात नाही; ठाकरे सरकारमधील आमदाराने केली मंत्र्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!
“कारसेवकांनी नाही, तर आम्हीच बाबरी पाडली हे सांगण्याचं धाडस भाजप का दाखवत नाही?”
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीचा छापा
गल्लीतून आला दुर्गंधीचा वास, बंद खोलीच दार उघडताच….
Comments are closed.