बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईकरांवर पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार?; पालकमंत्र्यांकडून लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत

मुंबई | राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या 24 तासामध्ये एकट्या मुंबईत 1361 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच गेल्या तीन महिन्यातील हा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईमध्ये अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

आता मुंबईवर आणि मुंबईकरांवर पुन्हा एकदा निर्बंधांची टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळत आहे. एका वृत्तपत्राशी बोलत असताना पालक मंत्री असलम शेख यांनी वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुंबईमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशा प्रकारची माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 97 हजार 983 एवढी झाली असून मुंबईमध्ये 9 हजार 319 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. राज्यात रविवारी 11 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने ही स्थिती ओढवल्याचं प्रशासनाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

कोरोनाचा हा वाढता उद्रेक जर नियंत्रणात आला नाही तर मुंबईमध्ये अंशतः लॉकडाऊन करण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटून सर्वच ठिकाणी निर्बंध लागू केले जाऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं आणि अनावश्यक ठिकाणी गर्दी करणं टाळलं तर कोरोना हद्दपार होईल आणि जनजीवन लवकरच पूर्वपदावर येईल.

थोडक्यात बातम्या-

राज ठाकरेंनी घेतलेल्या ‘त्या’ भूमिकेचं देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत, म्हणाले…

विधानभवनावर कोरोनाचं सावट; तब्बल एवढे कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

‘…म्हणून महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’; केंद्रीय पथकाने सांगितलं कारण

नाणार प्रकल्पासाठी शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन, म्हणतात…

‘तेरे को का लगता था की नहीं लौटेंगे…’; जयंत पाटलांसाठी समर्थकांनी शेअर केला व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More