बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नव्या Omicron व्हेरिएंटची लक्षणं कोणती?; आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | कोरोना (Corona) रूग्णसंख्या कमी होत असताना आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या ओमिक्राॅन व्हेरिएंटमुळे (Omicron variant) गेल्या 10 दिवसांत त्यांनी 30 रुग्णांना कोरोना विषाणूच्या नवीन प्रकार समोर आला आहे. अशातच आता दक्षिण आफ्रिकेतील एका डॉक्टरने नवीन ओमिक्राॅन व्हेरिएंटचे प्रकार ओमिक्रॉनची लक्षणे (Symptoms of Omicron) काय आहेत हे उघड केलं आहे.

ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णाला अत्यंत थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे आणि कोरडा खोकला यासारख्या समस्या असतात. शरीराचे तापमान वाढतं, असं दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या प्रमुख अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितलं.

काही रूग्णांमध्ये ओमिक्राॅनची लक्षणे ही काही वेगळी देखील आढळली आहेत. ओमिक्रॉनची लक्षणे सौम्य असली तरी काही रुग्ण रुग्णालयात दाखल न होताच बरे झाले आहेत. त्यामुळे डाॅक्टरांनी देखील सुटकेचा श्वास घेतला आहे. असं असलं तरी हलगरजीपणा महागात देखील पटू शकतो.

दरम्यान, ओमिक्राँन लवकर आपलं स्वरूप बदलतो. या व्हेरिएंटची लक्षणं कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा खूप जास्त वेगळी आहेत. तसेच आतापर्यंत पाहिलेले सर्व रुग्ण लसीकरण केलेले नव्हते, असंही अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितलं आहे

थोडक्यात बातम्या-

“आम्ही सरकार पाडणार नाही, ज्यादिवशी सरकार पडेल त्यादिवशी…”

‘ही’ मराठी अभिनेत्री का म्हणतेय?, हा ट्रॅप आहे यात अडकू नका

“मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि ते परत घरात दिसेनासे झाले”

नोकरी गमावलेल्यांना सरकार देणार भत्ता ‘ही’ आहे भन्नाट योजना

कंगणा पुन्हा प्रेमात?,मिठी मारलेला फोटो कुणाचा?, बड्या नेत्याच्या नावाची चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More