बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गुप्ता, मी लय बारीक बघतो, हे काम छा-छू झालंय’; पुणे पोलीस आयुक्तांना अजित पवारांनी सुनावलं

पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पुण्यातील पोलीस मुख्यालयाच्या कामाची पाहणी केली. ते सकाळीच पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाले होते. यावेळी कामाचा दर्जा पाहून अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला. यावेळी अजित पवारांनी सर्वांसमोर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना खडेबोल सुनावल्याचं पहायला मिळालं.

गुप्ता, मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लय बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर हे छा-छू काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचंच काम असं केलं असेल तर बाकीच्यांचं काय, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

चांगलं काम बघण्यासाठी मला बोलवा, असं म्हणत कामाच्या दर्जावर अजित पवार संतापले. अजित पवार यांनी पोलीस मुख्यालयात फिरून बांधकामातील त्रुटी दाखवून दिल्या. यावेळी अजित पवारांनी अधिकारी आणि कंत्राटदारालाही धारेवर धरलं.

अजित पवार यांनी कोरोना काळात योगदान दिलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला. कोविड काळात जे पोलीस मृत झाले त्यांच्या कुटुंबियांचा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर अजित पवार विधानभवात कोरोना आढावा बैठक घेणार आहेत.

थोडक्यात बातम्या- 

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

“मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा”

‘पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी द्या’; शेतकऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

“शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा, शिवसेना नसती तर…”

‘या’ वयोगटातील मुलांना मास्कची गरज नाही; वाचा केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More