2 महिन्यांचा पाठलाग; टी 1 वाघिण अखेर ठार

यवतमाळ | 13 निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या टी 1 वाघिणीला ठार करण्यात वन विभागाच्या पथकाला अखेर यश आलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे 200 कर्मचारी 24 तास काम करत होते.

प्रथम वाघिणीला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न करण्यात आले, पण त्यात अपयश आल्याने वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आलंय.

सर्वोच्च न्यायालयाने वाघिणीला बेशुद्ध करुन पकडण्यात यावे, असं सांगितले होतं. मात्र, मृत टी 1 वाघिणीचे छायाचित्र पाहून वन्यप्रेमींनी शंका व्यक्त केल्या आहेत. खरंच तिला बेशुद्ध करुन पकडण्याचा प्रयत्न झाला होता का? असा प्रश्न वन्यप्रेमींकडून विचारला जातोय.

दरम्यान, शार्प शुटर शाफत अली खान यांचा मुलगा असगर अलीने तिला ठार केले.

महत्त्वाच्या बातम्या-

रामदास आठवलेंकडून शरद पवारांना उपपंतप्रधान पदाची आॅफर!

-एेश्वर्या रायला लालूच्या पोरानं पाठवली घटस्फोटाची नोटीस!

-क्रिकेटच्या मैदानात देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी!

-…नाहीतर पणन कार्यालय जाळून टाकू; बच्चू कडू यांचा इशारा!

-…म्हणून आजही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत आघाडीची चर्चा अडली!