…म्हणून T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे वर्चस्व राहणार; सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर

T20 World Cup 2024 l आयसीसी टी20 विश्वचषक 2024 चे काउंटडाउन सुरु झाले आहे. 9व्या टी-20 विश्वचषकाची सुरुवात अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने होणार आहे. भारतीय संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. मात्र त्याआधी भारताला सराव सामन्यात सहभागी व्हायचे आहे. आयसीसीने या मेगा टूर्नामेंटपूर्वी सराव सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.

भारतीय संघाचे राहणार वर्चस्व :

27 मे पासून ICC T20 विश्वचषक सामन्यांना जोरदार सुरुवात होणार आहे. पण भारतीय संघ आपला सामना शनिवार, 1 जून रोजी खेळणार आहे. भारतीय संघ बांगलादेशशी मुकाबला करणार आहे. दोन्ही संघांनी आपापले संघही जाहीर केले आहेत.

जर आपण T20 मध्ये दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोललो तर आतापर्यंत दोन्ही संघ 13 वेळा आमनेसामने आले आहेत. या काळात भारताच वर्चस्व राहणार आहे. भारताने 13 पैकी 12 सामने जिंकले आहेत. तर, बांगलादेशने केवळ 1 सामना जिंकला आहे.

T20 World Cup 2024 l असे असणार सराव सामन्यांचे वेळापत्रक :

27 मे रोजी होणारे सामने :

1. कॅनडा विरुद्ध नेपाळ
2.नामिबिया विरुद्ध युगांडा
3. ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी

28 मे रोजी होणारे सामने :

1. श्रीलंका विरुद्ध नेदरलँड
2. ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया
3. बांगलादेश विरुद्ध यूएसए

29 मे रोजी होणारे सामने:

1. दक्षिण आफ्रिका विरुद्ध इ्ट्रा स्क्वाड मॅच
2. अफगाणिस्तान विरुद्ध ओमान

30 मे रोजी होणारे सामने :

1. नेपाळ विरुद्ध यूएसए
2. नेदरलँड विरुद्ध कॅनडा
3. वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
4. स्कॉटलंड विरुद्ध युगांडा
5. नामिबिया विरुद्ध पापुआ न्यू गिनी

31 मे रोजी होणारे सामने :

1. आयर्लंड विरुद्ध श्रीलंका
2. स्कॉटलंड विरुद्ध अफगाणिस्तान

1 जून रोजी होणारे सामने :

1. भारत विरुद्ध बांगलादेश

News Title – T20 World Cup 2024

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंचा मुंडे बंधू-भगिनीला इशारा, थेट म्हणाले..

दोन लाख रुपये घे आणि अर्ज मागे घे, ‘या’ उमेदवाराने शिंदे गटावर केला आरोप

ग्राहकांनो सराफ दुकानात जाण्याआधी ही बातमी वाचा! जाणून घ्या सोने, चांदीचे आजचे दर

एकनाथ शिंदे गटाला सर्वात मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्यानी दिला तडकाफडकी राजीनामा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; राज्यात ‘या’ दिवशी मान्सून दाखल होणार