‘अंपायरने गडबडीत चुकीचा निर्णय दिला’; आफ्रिका मीडियाचा मोठा दावा

T20 World Cup 2024

T20 World Cup 2024 | बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यात फायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाने फलंदाजी करून साऊथ आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 177 धावांचे आव्हान दिलं होतं.

भारतानं इतिहास रचला

वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारतानं वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे. भारतानं दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत केलं. हा सामना मोठा चुरशीचा झाला. दोन्ही संघ तुल्यबळ होते. भारत पराभवाच्या उंबरठ्यावर होता. समोर पराभव दिसत असताना भारतानं दक्षिण आफ्रिकेच्या हातातून हा सामना हिसकावून घेतला. भारतीय संघ विश्वविजेता बनला.

सूर्यकुमार यादवने या सामन्यात मोक्याच्या क्षणी ऐतिहासिक कॅच पकडला. सूर्याने पकडलेल्या या कॅचवरुन आफ्रिका मीडियाने प्रश्न उपस्थित केलेत. आयसीसीच्या नियमांचा हवाला देऊन हा सिक्स असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

T20 World Cup 2024 | “अंपायरने चुकीचा निर्णय दिला”

अंपायरने घाई गडबडीत चुकीचा निर्णय दिला, असं काहींचं म्हणणं आहे. त्यांनी हा व्हिडीओ झूम करुन शेअर केलाय. त्याचा पाय बाऊंड्रीच्या रोपला लागल्याचा त्यांचा दावा आहे. काही फॅन्सनी बाऊंड्रीचा नियम समजावून हा सिक्स असल्याचं म्हटलंय.

T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये लास्ट ओव्हरचा पहिला चेंडू हार्दिक पांड्याने फुलटॉस टाकला. स्ट्राइकवर असलेल्या मिलरने त्यावर हवेत फटका मारला. बाऊंड्रीपार चेंडू जाणार असं वाटलं.

सूर्युकमारने जबरदस्त कॅच पकडली. सगळेच जण त्यामुळे हैराण झाले. कॅच पकडल्यानंतर त्याने बाऊंड्री लाइन ओलांडली. पण त्याआधी त्याने चेंडू हवेत उडवला. त्यानंतर त्याने पुन्हा मैदानात येऊन कॅच पकडली.

महत्त्वाच्या बातम्या- 

पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर; अजित पवारांना धक्का

‘मी आरडाओरडा केला आणि काढ ती बंदूक म्हणाले…’; रुपाली ठोंबरेंसोबत घडला भयानक प्रकार

टीम इंडियाची स्वप्नपूर्ती! T20 वर्ल्ड कपवर कोरलं नाव

प्रेमीयुगुलांसाठी पावसाळ्यात ‘ही’ ठिकाणे आहेत पर्यटनाची बेस्ट ऑप्शन्स!

राज्यातील ‘या’ भागांना हवामान खात्याचा अत्यंत महत्वाचा इशारा!

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .