टीम इंडियाचा दणदणीत विजय! इंग्लंडच्या पराभवाची ही आहेत 3 कारणे

IND vs ENG l टी20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव केला आहे. भारताने हा सामना 68 धावांनी जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. इंग्लंडच्या पराभवाची तीन महत्त्वाची कारणे होती. उपांत्य फेरीत त्याची फलंदाजी खराब झाली. यासह काही प्रमाणात गोलंदाजही पराभवाला कारणीभूत ठरले. भारताकडून रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार कामगिरी केली आहे.

IND vs ENG l सलामीवीर इंग्लंडला चांगली सुरुवात देऊ शकले नाहीत :

इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. पण त्याचा फायदा संघाला करता आला नाही. भारताच्या डावात विराट कोहली केवळ 9 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. यानंतर ऋषभ पंत वैयक्तिक 4 धावांवर बाद झाला. इंग्लंडला या दोन विकेट्स खूप लवकर मिळाल्या. मात्र यानंतर रोहित आणि सूर्याने चांगली खेळी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांना रोहित आणि सूर्याची जोडी योग्य वेळी फोडता आली नाही. त्यामुळे इंग्लंडच्या पराभवात हे महत्त्वाचे कारण ठरले आहे.

भारताने इंग्लंडला विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य दिले होते. या वेळी फिलिप सॉल्ट आणि जोस बटलर संघासाठी सलामीला आले. मात्र ते संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाही. सॉल्ट 8 चेंडूत केवळ 5 धावा करून बाद झाला. तर बटलर 15 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. बटलरला अक्षरने बाद केले.

इंग्लंडची फलंदाजी खराब झाली :

खराब सुरुवातीनंतर इंग्लंड संघाला सावरता आले नाही. संघाची पहिली विकेट बटलरच्या रूपाने पडली. तर तिसरी विकेट जॉनी बेअरस्टोच्या रूपाने पडली. अशाप्रकारे मोईन अली केवळ 8 धावा करून निघून गेला. सॅम करन 2 धावा करून बाद झाला. तर हॅरी ब्रूकने 19 चेंडूत 25 धावांचे योगदान दिले. लियाम लिव्हिंगस्टोन 11 धावा करून आणि ख्रिस जॉर्डन 1 धावा करून बाद झाला. भारताने दिलेल्या मोठ्या लक्ष्यासमोर संपूर्ण संघ 103 धावांवर गडगडला आहे.

News Title – T20 World Cup 2024 IND vs ENG

महत्त्वाच्या बातम्या

या राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी

मोठी बातमी! आमदारांनी अजितदादांचं टेंशन वाढवलं

मुख्यमंत्री पदाबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य!

रोज एक डाळिंब खाण्याचे ‘इतके’ फायदे ऐकून तुम्हीही चकित व्हाल!

“ओवैसींची खासदारकी रद्द करा”, नवनीत राणांचं राष्ट्रपतींना पत्र