स्वप्नांचा चक्काचूर; T20 World Cup मध्ये ‘या’ खेळाडूला डच्चू, वडिलांनी व्यक्त केली नाराजी

T20 World Cup | आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू आहे. टीम इंडियाचा फलंदाज आणि आयपीएलमध्ये केकेआर संघातून खेळणारा रिंकू सिंह चांगली कमगिरी करत आहे. मात्र रिंकू सिंहला टी 20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) घेतलं नाहीये. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आगरकरने पत्रकार परिषद घेतली आणि त्याने टी 20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) निवडलेल्या 15 खेळाडूंच्या नावांची घोषणा केली. त्यामध्ये रिंकू सिंहचं नाव नव्हतं. याबाबत रिंकूच्या वडिलांनी देखील खंत व्यक्त केली आहे.

मुंबई येथे अजित आगरकरने पत्रकार परिषद घेतली आणि रिंकूला पहिल्या पंधरामध्ये स्थान न देण्यामागचं कारण सांगितलं आहे. रिंकून कोणतीही चुकीची गोष्ट केली नाही. मात्र संघ संतुलित राहण्यासाठी त्याला संघात राखीव ठेवण्यात आलं आहे. आम्हाला हा निर्णय़ घेणं खूपच अवघड होतं. आपल्याला अतिरिक्त गोलंदाजाची आवश्यकता होती म्हणून आपण रिंकूला बाहेर बसवलं असल्याचं अजित आगरकरने सांगितलं आहे. (T20 World Cup 2024)

रिंकूप्रमाणे शुभमन गिलची देखील निवड करता आली नसल्याची माहिती अजित आगरकर यांनी दिलीये. टी 20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2024) संघाच्या निवडीवरून सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलं आहे. काही माजी खेळाडूंनी देखील निवडसमितीवर प्रश्न उपस्थित केलेत. नवज्योत सिंह सिद्धू, इरफान पठाण यांनी समालोचन करत असताना आपली नाराजी व्यक्त केली.

रिंकूच्या वडिलांची नाराजी

रिंकू सिंहला पहिल्या 11 खेळाडूंमध्ये पाहायचं होतं. मात्र रिंकूला स्थान दिलं नाही. यावरून आता रिंकूच्या वडिलांनी आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, रिंकू आता टी 20 विश्वचषकाच्या प्लेईंग 11 खेळणार याचा आम्हाला आनंद झाला होता. मात्र त्याला संघात न घेतल्याने आम्ही नाराज आहोत. टीम इंडिया खेळणार आहे त्यासाठी आम्ही उत्साही आहोत. मात्र रिंकूने त्याच्या आईला फोन करून सांगितलं तेव्हा तो देखील नाराज होता, असं रिंकूचे बाबा म्हणाले.

टी 20 विश्वचषक भारतीय संघ

रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

रिंकू सिंह, शुभमन गिल, आवेश खान, खलिल अहमद, यांना राखीव खेळाडू म्हणून टी 20 विश्वचषकात खेळण्याची संधी दिली आहे. रिंकूला संघात न घेतल्याने क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर निवड समितीवर संताप व्यक्त केला आहे.

News Title – T20 World Cup 2024 Team India

महत्त्वाच्या बातम्या

“मला लॉक केलं आणि कपडे काढून…”, अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ

महत्वाची बातमी! आरोग्य विमा घेणाऱ्यांना आणखी एक मोठा धक्का

सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ, निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

सुषमा अंधारेंचं हेलिकॅाप्टर कोसळलं, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर

कोपर्डी बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट; …त्याला स्मशानभूमीत रात्रभर नग्न बसवले