बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

T20 World Cup: पाकिस्तानची जोरदार हॅट्रिक, अफगाणिस्तानवर 5 विकेट्सनं मिळवला विजय

दुबई | टी20 वर्ल्ड कपच्या सामन्यांना जोरदार सुरुवात झाली आहे. काल अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये रंगतदार सामना पहायला मिळाला. या सामन्यात पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर 5 विकेट्सनं जोरदार विजय मिळवला. या टी20 2021 मधील पाकिस्तानची ही हॅट्रीक आहे. पाकिस्तानचा या स्पर्धेतील हा तिसरा विजय ठरला.

अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्ताननं पाकिस्तानसमोर 148 धावांचं लक्ष ठेवलं होतं. हे लक्ष पाकिस्ताननं 5 गडी राखत पार पाडलं आणि अफगाणिस्तानवर विजय मिळवला.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने उत्कृष्ठ अर्धशतक झळकवत 51 धावा केल्या. त्याला सोबतच फखर जमानने 30 धावांची खेळी केली. पण संघाला खरी गरज असताना अखेरच्या काही षटकात असीफ अलीनं 7 चेंडूत 4 षटकार ठोकत नाबाद 25 धावा केल्या.

दरम्यान, शेवटच्या 12 बॉलमध्ये पाकिस्तानला विजयासाठी 24 रनची आवश्यकता होती. त्यावेळी करिम जनतच्या एकाच ओव्हरमध्ये असीफ अलीनं 4 सिक्स लगावत पाकिस्तानला 19 ओव्हरमध्येच जोरदार विजय मिळवून दिला. सध्या पाकिस्तानची खेळी पाहता टी20 वर्ल्ड कप त्यांच्या बाजूनं झुकत चालल्याचं पहायला मिळत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“शंभरपेक्षा जास्त लोकांना अडकवलंय, आता त्यांचा पर्दाफाश मी करणार”

रजनीकांत पुढचे काही दिवस रूग्णालयातच; तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर

…तर या कायद्याप्रमाणे वानखेडेंची चौकशी होणार, धनंजय मुंडेंचं मोठं विधान

किवींविरूद्ध भारताची मोठी रणनिती! ‘या’ दोन खेळाडूंना संघात संधी मिळण्याची शक्यता

मुंबई पोलिसांना सरकारकडून फक्त 750 रूपयांची दिवाळी भेट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More