T20 World Cup खेळणार रिषभ पंत, करोडोंच्या मशीनवर असा सुरु आहे सराव

T20 World Cup | भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक खेळाडू रिषभ पंत अपघातानंतर क्रिकेटपासून दूर आहे. डिंसेबर 2022 मध्ये पंतच्या कारचा भीषण अपघात झाला होता. तेव्हापासून पंत क्रिकेटला मुकला आहे. पण, अनेकदा पंतची झलक प्रेक्षक गॅलरीत, कार्यक्रमात तसेच आयपीएलच्या मिनी लिलावादरम्यान दिसली आहे. पंत सध्या रिकव्हरी मोडमध्ये आहे आणि 2024 मध्ये तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसण्याची शक्यता आहे. पंत सतत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतो आणि व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असतो. आता देखील त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

पंतचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसेल. कारण पंत पुनरागमनासाठी सज्ज असल्याचे दिसते. पंतने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो धावताना दिसत आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या पुनरागमनाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मागील दीड वर्षापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. तो त्याच्या रिकव्हरीबद्दल अपडेट्स देत असतो. आता पंतने खास ट्रेडमिलवर धावतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

पंतचा जोरदार सराव

पंतने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये तो ट्रेडमिलवर धावताना दिसत आहे आणि तंदुरूस्त असल्याचे संकेत देत आहे. पण या ट्रेडमिलनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले, कारण ही साधी ट्रेडमिल नाही जी आपण अनेकदा पाहतो. चला तर मग जाणून घेऊया या ट्रेडमिलच्या संबंधित खास बाबी.

T20 World Cup पंत तयार?

माहितीनुसार, या ट्रेडमिलची रचना NASA ने केली आहे, ही एक प्रकारची अँटी ग्रॅविटी ट्रेडमिल आहे, जी रिकव्हरीसाठी चांगले काम करते. हे यंत्र विशेषतः खेळाशी निगडीत असलेल्या लोकांसाठी खूप प्रभावी आहे. तसेच जे दुखापतग्रस्त आहेत त्यांच्यासाठी खूप मदतगार ठरते. हे इतर सामान्य ट्रेडमिलपेक्षा बरेच वेगळे आहे, कारण त्यावर धावताना शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम होतो.

 

capstonept.com या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, हे मशीन गुडघ्याच्या दुखापतींमधून बरे होण्यास मदत करते. याशिवाय या मशीनशी निगडित इतर फायदेही आहेत. काही वेबसाइट्सवर या ट्रेडमिलची किंमत भारतीय रुपयांमध्ये 4 ते 7 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूणच पंत रिकव्हरीसाठी खूप मेहनत घेत आहे शिवाय यासाठी करोडो रुपये खर्च करत आहे.

दरम्यान, 31 डिसेंबर 2022 रोजी रिषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला. त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर गेला तो आजतागायत परतला नाही. त्यामुळे आता आशा आहे की रिषभ पंत लवकरच पुनरागमन करेल. पंत आयपीएल 2024 मधून पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली होती. पण अद्याप पंतकडून याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

News Title- T20 World Cup Rishabh Pant has shared a video of him exercising
महत्त्वाच्या बातम्या –

Jackie Shroff यांचं सोशल मीडियावर होतंय कौतुक, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल एक नं भिडू

Sania Mirza | ‘जी गोष्ट तुमची शांतता…’; घटस्फोटाच्या चर्चेनंतर सानियाची पोस्ट

Food Combos | अंड्यासोबत ‘या’ गोष्टी खाणं टाळा, अन्यथा होतील गंभीर परिणाम

Nagarjuna | ‘मी मोदींचा अपमान…’; अभिनेता नागार्जुनचा सर्वांत मोठा निर्णय!

Ram Mandir | हमारे राम आए हैं…, विराट आणि अनुष्काचा आनंद गगनात मावेना