बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

T20 World Cup: करायला गेला रोनाल्डोची काॅपी, अन्….

दुबई | सध्या दुबईमध्ये टी20 वर्ल्ड कपचे रंगतदार सामने पहायला मिळत आहे. 28 तारखेला झालेल्या सामन्यात डेव्हिड वाॅर्नरची आक्रमक खेळी पहायला मिळाली. त्यानं श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक ठोकत ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून दिला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकारपरिदेत मात्र त्याची फजिती झालेली पहायला मिळाली.

पत्रकार परिषदेत डेव्हिड वाॅर्नरनं फुटबाॅलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची नकल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं जात आहे. याचा एक व्हिडीेओही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओनं सध्या सगळ्याचचं लक्ष वेधलं आहे.

एका पत्रकार परिषदेत बसलेला असताना रोनाल्डोनं टेबलवरील कोकच्या दोन बाटल्या उचलून घेतल्या आणि साईडला ठेवल्या त्यामुळे त्या कोक कंपनीला मोठं नुकसानं झालं होतं. असंच काहीसं करण्याचं प्रयत्न डेव्हिड वाॅर्नरनं केला. मात्र यावेळी वाॅर्नरला कोकची बाॅटल पुन्हा टेबलवर ठेवण्यास सांगण्यात आलं. त्याची झालेली ही फजिती व्हिडीओमध्ये कैद झाली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेनं निर्धारित ओव्हर्समध्ये 6 आऊट 154 रन केले. त्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियानं 17 व्या ओव्हर्समध्येच 3 विकेटच्या मोबदल्यात हे लक्ष्य साध्य केलं.

 

थोडक्यात बातम्या – 

डेल्टा व्हेरिएंटविषयी संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

पुनित राजकुमार यांच्या आयुष्यातील ‘ही’ खास व्यक्ती भारतात आल्यानंतरच होणार अंत्यसंस्कार

पुणेकरांची प्रतिक्षा संपणार! नव्या वर्षात पुणे मेट्रो सेवेत दाखल होणार

T20 World Cup: पाकिस्तानची जोरदार हॅट्रिक, अफगाणिस्तानवर 5 विकेट्सनं मिळवला विजय

संपुर्ण राज्यात गाजत असलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सुरूवात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More