नवी दिल्ली | तबलिगी जमातीच्या लोकांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केली आहे. सरकारच्याही अनेक चुका झाल्या आहेत, पण सरकारवर टीका करण्याची ही वेळ नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
आपली पहिली लढाई ही कोरोनाशी आहे. विदेशातून आलेले लोक कसे काय फिरत होते, असा सवाल करत या गोष्टीचे समर्थन कुठल्याही पद्धतीने होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले आहे.
दुसरीकडे मात्र मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही, असं वक्तव्य मरकजचे अध्यक्ष मौलाना साद यांनी केलं आहे. मशिदीमध्ये जमा होण्यानं आजार होईल, हा विचारही मूर्खपणाचा आहे. अल्लाहवर विश्वास ठेवा. कुराण वाचत नाहीत आणि वर्तमानपत्रं वाचतात आणि घाबरून पळत सुटतात. अल्लाह यासाठीच काहीतरी अडचणी निर्माण करतो, कारण त्याला पाहायचं असतं की अशा परिस्थितीत माझा बंदा काय करतो?, असं म्हणत मौलाना साद यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.
लॉकडाऊनच्या घोषणेनंतर खबरदारी म्हणून धार्मिक स्थळं बंद करण्यात आली आहेत. तरीही या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि त्यामधून कोरोनाचा संसर्गही झाला. दिल्लीतील मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावरुन मौलाना मोहम्मद साद कांधलवी आणि तब्लिगी जमातच्या इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामारी कायदा 1897 आणि भारतीय दंड विधानांच्या कलमांनुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“कठीण काळात देखील पंतप्रधान मोदींनी केअर फंड उघडून प्रसिद्धीची संधी सोडली नाही”
अमेरिकेच्या नागरिकांना यावेळी नक्कीच लाज वाटत असेल; ट्रम्प यांच्यावर भडकली सोनम कपूर
महत्वाच्या बातम्या-
युवी अन् भज्जीने मदतीचं आवाहन केलं पण पाकच्या शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनसाठी; नेटकऱ्यांनी धरलं धारेवर
अझीम प्रेमजींचं दर्यादिल… पाहा त्यांनी खरंच किती रक्कम मदत दिलीये
मास्क न लावल्याने महाराष्ट्रात पहिला गुन्हा दाखल
Comments are closed.