देश

“हिंदूंना धडा शिकवण्यासाठी…”,आपच्या निलंबित नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा!

नवी दिल्ली | २०१७ मध्ये नगरसेवक झालोय. तेव्हापासूनच पैसे आणि राजकारणाच्या जोरावर हिंदूंना धडा शिकवण्याचा विचार माझ्या मनात सुरु होता, अशी धक्कादायक कबुली आम आदमी पक्षाचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन यानं दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशी दरम्यान  दिल्ली हिंसाचाराच्या मागे आपलाच हात असल्याचंही हुसैन यानं अखेरीस मान्य केलं आहे.

काश्मिरमधील 370 कलम रद्द झाल्यावर आणि नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा हिंसाचार घडला. या हिंसाचारातील प्रमुख आरोपी म्हणून ताहिर हुसैनला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यानं अनेक खळबळजनक विधानं केली आहेत.

या कामासाठी हुसैनला खालिद सैफी आणि पॉप्युर फ्रण्ट ऑफ इंडिया या कडवट मुस्लीम संघटनेनं मदत केल्याचं हुसेननं मान्य केलं आहे. हुसैन म्हणाला की, काश्मीरमध्ये कलम 370 रद्द झाल्यानंतर सैफी माझ्याकडे आला. यादरम्यान राम मंदिर खटल्याचा निकालही समोर आला. तेव्हा मला पाणी डोक्यावरुन जाऊ लागलं आहे असं वाटू लागलं.

मला जास्तीत जास्त काचेच्या बाटल्या, पेट्रोल आणि दगड गोळा करुन छप्परावर ठेवण्याचं काम देण्यात आलं होतं. तसेच खालिद सैफीने जवळच्या लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलनासाठी तयार केल्याचंही हुसैन यानं आपल्या कबुली जबाबात सांगितलं आहे.

उद्या लॉन्च होतोय जबरदस्त फिचरसह रेडमीचा नवा फोन, किंमत असणार फक्त 10 हजाराच्या आसपास!

“जगणं राहिलंच, निदान त्याला मरु तरी द्या”

कोरोनाचा धुमाकूळ… देशात गेल्या तासांत तब्बल एवढे हजार कोरोना रूग्ण

मैं हूँ ना…. चिंता करू नकोस, राज ठाकरेंचा अविनाश जाधवांना खास निरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या