Top News देश राजकारण

नितीश कुमार शारीरिक आणि मानसिकरित्या थकलेत; तेजस्वी यादव यांचा टोला

बिहार | बिहारमध्ये सध्या निवडणूकीचे वारे वाहत आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार सोमवारी संध्याकाळी संपला. दरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सणसणीत टोला लगावलाय.

“नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले आहेत. त्यामुळे ते माझ्याबाबतीत जे काही बोलतील ते माझ्यासाठी आशीर्वादाप्रमाणेच आहेत”, असा तेजस्वी यांनी टोला लगावलाय.

याबाबत तेजस्वी यादव यांनी एक ट्विट केलंय. ते म्हणतात, “नितीश कुमार यांनी माझ्याबाबत कोणतेही अपशब्द उच्चारले तरी माझ्यासाठी तो आशीर्वाद आहे. नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकले आहेत. त्यामुळे ते काहीही बोलले तरी त्यांची प्रत्येक गोष्ट मी आशिर्वादच समजतो.

यावेळी, बिहारने निर्णय घेतला आहे की, केवळ भाकरी-रोजगार आणि विकासाच्या मुद्द्यांवर निवडणुका घेण्यात येतील, असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहीलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

पंकजा मुंडे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम प्रभावी होईल; ‘या’ खासदाराने व्यक्त केली खदखद

‘…असं सरसंघचालक मोहन भागवत कधीच सांगणार नाहीत- शिवसेना

योग्य वेळ आली की शिवसैनिकच नारायण राणेंना उत्तर देतील- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या