बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रमुखावर कारवाई करा”

पुणे | पुणे शहरात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ससून रुग्णालयात झाले असून, त्यासाठी रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ससून रुग्णालयाच्या प्रमुखांवर कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोनामुळे ससून रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावताना निष्काळजीपणा करण्यात आला आहे. या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवालाही उशिरा देण्यात आला. त्यामुळे तो रुग्ण राहत असलेल्या परिसरात करोनाचा संसर्ग वाढला असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे. अरविंद शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे.

कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यामृतदेहाची विल्हेवाट शासनाच्या गाईडलाईन नुसार होत नाही , त्यामुळे करोना संसर्गाचा धोका निर्माण होतोय,हे सुद्धा पत्रात नमूद केलेले आहे.

दरम्यान, रुग्णालयांर्तगत तसेच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभाग प्रमुखांमध्येही मोठ्या प्रमाणात नाराजी असून, अशा आपत्कालीन परिस्थितीत ससूनचे प्रमुख संयमीपणाने कामं करत नाहीत. त्याचा फटका रुग्णांना बसत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“राज्य सरकारने एक योजना सांगावी, नेमकं त्यांनी काय केलं?; आम्ही 8 कोटी लोकांना गॅस तर 2 कोटी लोकांना 500 रू दिले”

संजय राऊतांची मोदींवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं; चंद्रकांत पाटलांकडून राऊतांचा समाचार

महत्वाच्या बातम्या-

वाधवान प्रकरणावर सोमय्यानंतर आता भातळकरांचाही रोख अप्रत्यक्षपणे शरद पवारांकडेच!

मेंढपाळांच्या मदतीसाठी देवदूत होऊन धावून आले संजय राऊत!

वाधवानानंतर आणखी एक प्रकरण; राष्ट्रवादी काँग्रसेच्या ‘या’ आमदाराच्या भावाचा पुणे-मुंबई प्रवास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More