बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दबाव आला तरी सहन करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी अनधिकृत बांधकामं पाडण्याचे तात्काळ आदेश दिले आहेत. कसल्याही दबावास बळी न पडता दबाव सहन नका करू. तसेच दबाव झुगारून अनधिकृत बांधकामावर कारवाई करा. मी तुमच्या पाठिशी आहे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबईतील अनधिकृत बांधकामं सहन केली जाणार नाहीत. अधिकाऱ्यांनी अत्यंत जागरूक राहत आपलं कर्तव्य कठोरपणे पार पाडावं. मुंबईतील सर्व रस्ते दुरूस्त कामांची निविदा प्रक्रिया व्यवस्थितपणे आणि पारदर्शकपणे पार पाडावेत. जेणेकरून कोणालाही बोट उचलण्याची संधी मिळणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

आज मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीसाठी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल आणि अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.

दरम्यान, आपल्याला शहर सुंदर तसेच उच्च दर्जाच्या सुविधा असलेले करायचे आहे. त्यामुळं रस्ते, पदपथ, दुभाजक आणि रस्त्यांच्या कडीने कठडे, बागा सुंदर आणि स्वच्छ असतील असं स्वप्न पूर्ण करायचं आहे, तसेच या कामाच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या – 

“राणेंच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही, वेळ आली की कुंडली बाहेर काढू”

पेट्रोल-डिझेलचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारचा मास्टरप्लॅन, वाचा सविस्तर

अफगाणिस्तानात खळबळ! ‘या’ स्टार खेळाडूची तालिबान्यांकडून हत्या

विराटनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव सामन्यात मिळाले संकेत

‘गाव जेवण एक दिवस देणार की तीन वर्षे?’; अशोक चव्हाणांचा खोचक सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More