Top News पुणे महाराष्ट्र

“शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या सचिन तेंडुलकरचा ‘भारतरत्न’ काढून घ्या”

पुणे | भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आला आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष शिंदेंनी सचिनचा ‘भारतरत्न’ काढून घ्या, अशी मागणी केली आहे.

शेतकरी आंदोलनावर बोलण्यासाठी 70 ते 71 दिवसांनी सचिन जागा झाला आहे. सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीने शेतकऱ्यांच्या पाठीशी आज खऱ्या खर्थाने उभा राहण्याची गरज आहे. मात्र तो अशी शेतकरीविरोधी वक्तव्ये करतोय त्याचा भारतरत्न काढून घेतला पाहिजे, असं संतोष शिंदेंनी म्हटलं आहे.

सचिन तेंडुलकर नावाचा व्यक्ती शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खूपसून भाजपची सरकारची दलाली करण्यासाठी केंद्राच्या कृषी कायद्याचं समर्थन करतो आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत असल्याची टीकाही शिंदेनी केली आहे.

दरम्यान, सचिन राज्यसभेत खासदार होता त्यावेळी सभागृहात उपस्थिती लावली नाही. तिथे एक शब्दही काढला नाही आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर हा आता बोलतोय. याला फक्त भाजपची दलाली करायची आहे, असंही शिंदेनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

चुलता पंतप्रधान असताना भाजपनं पुतणीला तिकीट नाकारलं, वाचा सविस्तर!

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच, या नेत्याची होऊ शकते निवड!

“बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणं आणि स्मारक न बांधणं याला टाईमपास बोलतात”

“जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची”

महाविकास आघाडीत वादाचा नवा मुद्दा; ते पद आता कुणाकडे जाणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या