बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उन्हाळ्यात आजारांपासून वाचण्यासाठी ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी, वाचा सविस्तर

मुंबई |  कडाक्याचा उन्हाळा सुरु असून गरमीचा तडाखा वाढत चालला आहे. वाढत्या गरमीमुळे नागरिकही हैराण झाले आहेत. उन्हाळ्याच्या काळात (Summer) विशेष काळजी न घेतल्यास तुम्ही अनेक आजारांना निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरू शकता. त्यामुळे आजारांपासून वाचण्यासाठी योग्यरित्या काळजी घेणं गरजेचं असतं.

आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात खबरदारी घेण्याची गरज आहे. यासाठी उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या आणि संभाव्य उष्माघाताचा धोका टाळा. तीव्र उन्हात फिरणे टाळावे. हे शक्य नसल्यास, शरीरातील पाण्याची पातळी प्रमाणात राहील, याची खबरदारी घेतली पाहिजे.

मुलांनी नॉर्मल थंड पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे जे अत्यंत महत्वाचे आहे. आपले हात, पाय इत्यादी मूलभूत गोष्टीची स्वच्छता राखणे. कडक उन्हापासून दर रहा. सुती कपडे आणि हलके कपडे घाला. जास्त काळ उन्हात थांबू नका. पाणी अधिक असलेली टरबूज, खरबूज, काकडी, संत्री, मोसंबी ही फळे खावीत.

दरम्यान, उन्हात फिरताना ओआरएस पावडर टाकलेले पाणी पीत राहावे. उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला ज्यूस पिऊ नये कारण त्यात वापरलेले पाणी कोणते आहे हे तुम्हाला माहित नसते. उन्हाळ्यात योग्य फिटिंग अंडरवियर्स घाला जेणेकरून बुरशीजन्य संसर्ग होणार नाही. अंडरगारमेंट आणि कपडे गरम पाण्यातुन काढू शकता जेणेकरून जीवाणू नष्ट होतील.

थोडक्यात बातम्या – 

अभिनेता सिद्धार्थची पोस्ट चर्चेत; लाडक्या लेकींसोबत फोटो शेअर करत म्हणाला…

स्टाॅयनिसने खेचला 104 मीटर सिक्स, अन् गर्लफ्रेंडला इशारा करत…; पाहा व्हिडीओ

‘असल्या बुरसटलेल्या विचारांमुळेच तुमच्या मुलीला…’; राम सातपुतेंचा खडसेंवर हल्लाबोल

गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात गुन्हा दाखल

मनसेचा भोंगा, सेनेला धोका! संजय राऊत म्हणाले, “आमचा अयोध्या कार्यक्रम ठरला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More