बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

 “ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाकडून अर्थात ईडीकडून कारवाई सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी काही मंत्र्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचक इशारा दिला आहे.

राजू शेट्टी यांनी एक फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये ब्रम्हदेव आला तरी वीजबिल माफी नाही- अजित पवार, असं लिहिलेलं आहे. त्यावरून राजू शेट्टी यांनी एवढा अहंकार बरा नव्हे ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही, याची काळजी घ्या, असं म्हटलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन देखील करण्यात येत आहे.

शेतीसाठी दिवसा दहा तास वीज मिळत नाही तोवर आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. काल राजू शेट्टी यांनी ऊर्जामंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केलं. महावितरणाच्या वीज निर्मितीमध्ये साखर कारखान्यापेक्षाही मोठा घोटाळा असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी वीज प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात ईडीच्या कारवाया सुरू असतानाच राजू शेट्टी यांनी उपमुख्यंत्र्यांना इशारा दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे महावितरण कंपनीमध्ये लागेबांधे आहेत. जनतेच्या पैशाची महाविकास आघाडी सरकारकडून लूट सुरू आहे. शेतकऱ्यांचे वाटोळे करत असेल तर मंत्र्यांनाही तुडवू, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

Russia-Ukraine War | केंद्र सरकारकडून भारतीयांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

“बाळासाहेब म्हणायचे दाऊद आणि शरद पवारांची जोडी महाराष्ट्राची वाट लावणार”

रशियाकडून युक्रेनच्या दहा शहरांवर बॉम्ब हल्ला, ‘इतक्या’ नागरिकांचा मृत्यू 

Russia-Ukraine War | “युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी”

Russia-Ukraine War | युक्रेनसोबत रशियाचा नेमका वाद काय?, वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More