मुंबई। सध्या सणासुदीचा आणि लग्नसभारंभांचा मौसम (Wedding Season) आहे त्यामुळे सगळीकडेच सोनं आणि चांदी खरेदीसाठी (Festive Season Shopping) लगबग सुरू आहे. अशातच सोन्या चांदीचे (Gold-Silver Price) भाव वाढताना तसेच उतरताना दिसतात. या शिवाय नवीन वर्षाचा पहिला सण सुद्धा अगदी काही दिवसांवर आला आहे.
गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेकजण आपल्या पत्नीला सोन्याचे दागिने करत असतात. गुढी पाडव्याला सोनं खरेदीला अधिक महत्व आहे. बरेच लोक या दिवशी सोनं खरेदी करत असतात. मात्र या वेळेस सोनं खरेदी करत असताना काळजी घेणं गरजेचं आहे.
सोनं खरेदी करत असताना 22 कॅरेट आणि 18 कॅरेटच्या दागिन्यांचे दर आधीच चेक करणं गरजेचं आहे. शिवाय याला मजुरी किती लावली जाते याची देखील माहिती घेणं गरजेचं आहे.
सोनं खरेदी करताना 30 टक्के मेकिंग चार्ज आकारला जातो. ज्याचा फायदा ज्वेलर्सना अधिकअधिक होत असतो. त्यामुळे जर तुम्ही ते निट तपासून घेतलं नाही तर तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागू शकते.
थोडक्यात बातम्या-
“तू सटकला लेका, उंची आणि बुद्धी सारखीच आहे तुझी”
भाजपचा बडा नेता अडचणीत; संपत्ती जप्त होणार
पुढचे तीन दिवस महत्त्वाचे; राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता
महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; H3N2 च्या दुसऱ्या रूग्णाचा मृत्यू
‘देश का पंतप्रधान कैसा हो, शरद पवार…’; कार्यकर्त्यांच्या घोषणावर उद्धव ठाकरे हसले