फक्त 1 लाख रुपयांत घरी घेऊन जा मारुतीची ‘ही’ कार

नवी दिल्ली | मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कार ही उत्कृष्ट फिचर्ससाठी ओळखली जाते. मारुती स्विफ्ट ही मारुती कंपनीची सर्वात जास्त विकली जाणारी आणि लोकप्रिय कार आहे. मारुती स्विफ्ट लोकांच्या पसंतीस उतरली आहे. आजही अनेकांची पसंती मारुती स्विफ्ट आहे.

गेल्या महिन्यात देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्ये मारुती स्विफ्टने तिसरा क्रमांक पटकावला आहे. हीच कार आता तुम्ही एक लाख रुपयांत घरी घेऊन जावू शकता. या कारची एक्स शोरुम किंमत 6 ते 8.5 लाख आहे. तुम्ही ZXI Plus DT AMT ही कार EMI कॅल्क्युलेटद्वारे ही कार एक लाखात घेऊन जावू शकता.

ही महागडी कार घेण्याचं तुमचं स्वप्न असेल तर कंपनी यासाठी तुम्हाला अतिशय योग्य असा फायनान्स (finance) उपलब्ध करुन देते. आता या टाॅप माॅडेलवरचे फायनान्स प्लॅन जाणून घेऊयात. मारुती स्विफ्टचे टाॅप माॅडेल तुम्ही 10 टक्के डाऊनपेमेंट अर्थात 1 लाख रुपये इतकं डाऊन पेमेंट करुन तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. बँकांचे व्याजदर वेगवेगळे आहेत. तुम्ही 1 ते 7 वर्षाच्या दरम्यान कालावधी निवडू शकता. यासाठी तुमच्या बँकेचा व्याजदर 10% आणि कर्जाचा कालावधी 5 वर्ष असू शकतो.

स्विफ्ट ZXI Plus DT AMT ही टाॅप कारपैकी एक मानली जाते. ZXI Plus DT AMT ही कार 5 सीटर पेट्रोल कार आहे. स्विफ्टमध्ये 7 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट (Touchscreen infotainment) सिस्टम,उंची-अ‌ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, क्रूझ कंट्रोल, ऑटो एसी ही वैशिष्ट्य आहेत. ही कार तुम्ही खरेदी केल्यास महिन्याला तुम्हाला 5 वर्षांसाठी महिना 19,264 रूपयांचा EMI भरावा लागेल.

ही ऑटोमाॅटिक ट्रान्समिशनसोबत (Automatic transmission) या कारला 1197 cc इंजिन आहे. स्विफ्ट ZXI Plus DT AMT चे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचं आहे. 5 स्पीड AMT गिअरबाॅक्स आहेत. पेट्रोल मोडमध्ये कारचे मायलेज 22 km/litre आणि सीएनजीमध्ये सुमारे 30.90 km/kg आहे.

महत्त्वाच्या बातम्या