बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दोन डोस घेतल्यानंतरही मृत्यू होतात, हे गांभीर्याने घ्या- अजित पवार

पुणे | कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतल्यानंतरही काहींना कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे हे सर्व गांभीर्याने घ्या असा, सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागरिकांना दिला आहे.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील काऊन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याबाबतची दक्षता घेण्यासोबतच मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व इतर दक्षता नियमांचे काटेकोर पालन करावं, असं आवाहन अजित पवारांनी केलं.

पुण्यात 50 लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे पण दोन दिवस झाले लस नसल्याने लसीकरण बंद आहे. लस पुरवठा होईल तसं लसीकरण करत आहोत. मृत्यू दर कमी झालाय पण लोकांनी मास्क वापरण्याची गरज आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याने खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

कोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. नियम न पाळणाऱ्यांवर काटेकोर कारवाई करावी. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध अधिक कडकपणे कारवाया करण्याचे स्पष्ट निर्देश अजित पवार यांनी आज दिले.

थोडक्यात बातम्या- 

टाटा ग्रूपच्या मालकीची टीसीएस कंपनी ‘इतक्या’ हजार फ्रेशर्सला देणार नोकरी!

नाना पटोलेंच्या खुलास्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार; गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मी स्वत: बोलेन, पण ‘हे’ प्रकल्प वेगाने पूर्ण करा- उद्धव ठाकरे

मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार? पालकमंत्र्यांचं सूचक विधान

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More